Delhi Capitals Covid News : चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यावर कोरोनाचं सावट, दिल्लीचा नेट बोलर कोरोनाबाधित
Delhi Capitals Covid News : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दिवसातील दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) या दोन्ही संघात पार पडणार आहे. पण या सामन्यावर कोरोनाचं सावट घोंगावत आहे.
![Delhi Capitals Covid News : चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यावर कोरोनाचं सावट, दिल्लीचा नेट बोलर कोरोनाबाधित IPL 2022 Delhi Capitals Net Bowler Tests Positive for Covid 19 DC team in Isolation Check Details Delhi Capitals Covid News : चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यावर कोरोनाचं सावट, दिल्लीचा नेट बोलर कोरोनाबाधित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/b057dae4bb75eb5391d0f9e4018d9b79_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Corona in IPL : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दोन सामने पार पडणार आहेत. पण दिवसातील दुसरा सामना कोरोनाच्या सावटाखाली आला आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यातील या सामन्यापूर्वी दिल्ली संघातील एका नेट बोलरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संघाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
दरम्यान याआधी देखील दिल्ली संघातच कोरोनाची बाधा झाली होती. पण संबधित खेळाडू कोरोनातून सावरले देखील. त्यामुळे संघाचे सर्व सामने वेळापत्रकाप्रमाणे खेळवले गेले होते. पण आज सामन्याला काही तास शिल्लक असताना ही माहिती समोर आल्याने आजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभी राहताना दिसत आहेत.
आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,''आज सकाळी दिल्ली संघाची कोरोना चाचणी करताना एका नेट बॉलरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खेळाडूंना आपआपल्या खोल्यांमध्ये राहण्यास सांगितले आहे. दरम्यान आज होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या रविवारच्या सामन्याच्या काही तास अगोदरच ही माहिती समोर आली आहे.''
2021 मध्येही झाली होती कोरोनाची बाधा
मागील वर्षी अर्थात 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 चा हंगाम 4 मे 2021 रोजी अर्ध्यातूनच थांबवावा लागला होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबादचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते. तर, कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)