News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

FIFA World Cup 2022: साऊदी अरबचा पराभव, पोलंडनं 2-0 नं विजय मिळवला

FIFA World Cup 2022: पोलंडने 2-0 ने साऊदी अरब संघाचा पराभव करत यंदाच्या विश्वचषकातील विजयाचं खातं उघडलं आहे. 

FOLLOW US: 
Share:

Poland vs Saudi Arabia: सात दिवसांपासून कतारमध्ये फिफा विश्वचषकाची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक सामना अटीतटीचा होत आहे. ग्रुप सी मध्ये आज झालेल्या सामन्यात पोलंडने 2-0 ने साऊदी अरब संघाचा पराभव करत यंदाच्या विश्वचषकातील विजयाचं खातं उघडलं आहे. 

फिफा वर्ल्ड कपच्या सातव्या दिवशी पोलंड आणि साऊदी अरब या संघातील सामना रोमांचक झाला. या सामन्यात पोलंडने बाजी मारत साऊदी अरबचा 2-0 च्या फराकानं पराभव केला. या स्पर्धेतील पोलंडचा हा पहिला विजय होय. याआधी पोलंड आणि मॅक्सिको यांच्यातील सामना ड्रॉ झाला होता. तर साऊदी अरब संघाने अर्जेंटिनाचा पराभव करत विश्वचषकात मोठा उलटफेर केला होता. पण आज झालेल्या सामन्यात साऊदी अरबला पराभवाचा सामना करावा लागला. साऊदी अरबचे दोन सामन्यात तीन गुण झाले आहेत. तर पोलांडचे दोन सामन्यात चार गुण झाले आहेत. 

पोलांडसाठी कुणी केले गोल?
पियोत्र जिलेंस्की आणि राबर्ट लेवनडॉस्की यांनी पोलंडसाठी महत्वाच्या क्षणी गोल करत सामना फिरवला. पोलंडसाठी 40 व्या मिनिटाला पियोत्र जिलेंस्की याने पहिला गोल केला. तर राबर्ट लेवनडॉस्की याने 92 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. पियोत्र जिलेंस्की आणि राबर्ट लेवनडॉस्की यांच्या अचूक गोलच्या जोरावर पोलंड संघाने 2-0 ने विजय मिळवला. दरम्यान, यंदाच्या विश्वचषकातील साऊदी अरबचा हा पहिला पराभव होय. पहिल्या सामन्यात साऊदी अरबने अर्जेंटिनाचा पराभव करत फूटबॉल प्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला होता.  दरम्यान, ग्रुप डी मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं ट्युनिशियाचा 1-0 ने पराभव केलाय. यंदाच्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय होय.  

ऑस्ट्रेलियाचा विजय, ट्युनिशियाला 1-0 नं हरवलं -
कतार येथे सुरु असलेल्या फिफा फूटबॉल विश्वचषकात ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा 1-0 च्या फरकानं पराभव केला. कतार विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय आहे.  या विजयासह ऑस्ट्रेलियाचे तीन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन सामन्यात तीन गुणांसह ऑस्ट्रेलियानं फ्री क्वॉर्टर फायनलमधील आवाहन जिंवत ठेवलं आहे. याआधी ग्रुप डी मधील ट्युनिशिया आणि डेनमार्क यांचा सामना ड्रॉ झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला असला तरीही ट्युनिशिया संघाचे प्री-क्वार्टर फायनलचं आवाहन जिवंत आहे. 

आणखी वाचा :
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा 12 वर्षानंतर फिफा विश्वचषकात विजय, ट्युनिशियाला 1-0 नं हरवलं

Published at : 26 Nov 2022 10:48 PM (IST) Tags: FIFA World Cup FIFA World Cup 2022 Poland vs Saudi Arabia

आणखी महत्वाच्या बातम्या

EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले? 

EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले? 

EURO 2024 : फ्रान्सचा कॅप्टन किलियन एमबाप्पेचं नाक फुटलं पण लढत राहिला, ऑस्ट्रियाला 1-0 नं पराभूत करुनच थांबला 

EURO 2024 : फ्रान्सचा कॅप्टन किलियन एमबाप्पेचं नाक फुटलं पण लढत राहिला, ऑस्ट्रियाला 1-0 नं पराभूत करुनच थांबला 

Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना

Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

टॉप न्यूज़

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य

Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य