(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा 12 वर्षानंतर फिफा विश्वचषकात विजय, ट्युनिशियाला 1-0 नं हरवलं
Australia vs Tunisia : कतार येथे सुरु असलेल्या फिफा फूटबॉल विश्वचषक ऑस्ट्रेलियानं विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा 1-0 च्या फरकानं पराभव केला आहे.
Australia vs Tunisia Match Report: कतार येथे सुरु असलेल्या फिफा फूटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा 1-0 च्या फरकानं पराभव केला आहे. कतार विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय आहे. सात दिवसांपासून कतारमध्ये फिफा विश्वचषकाचं रणकंद सुरु आहे. ग्रुप डीच्या सामन्यात ट्युनिशियाचा 1-0नं पराभव करत ऑस्ट्रेलियानं यंदाचं विजयाचं खातं उघडलं आहे.
यासह ऑस्ट्रेलियाचे तीन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन सामन्यात तीन गुणांसह ऑस्ट्रेलियाचं प्री क्वॉर्टर फायनलमधील आवाहन जिंवत ठेवलं आहे. याआधी ग्रुप डी मधील ट्युनिशिया आणि डेनमार्क यांचा सामना ड्रॉ झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला असला तरीही ट्युनिशिया संघाचे प्री-क्वार्टर फायनलचं आवाहन जिवंत आहे.
मिशेल ड्यूक याने केला एकमेव गोल
ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यातील सामना रोमांचक झाला. मिशेल ड्यूक यानं या सामन्यात एकमेव गोल केला. फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा 12 वर्षानंतरचा विजय आहे. याआधी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं अखेरचा सामना जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला फिफा विश्वचषकात एकही सामना जिंकता आलेला नाही. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा फिफा विश्वचषकात खेळत आहे. अटीतटीच्या सामन्यात मिशेल ड्यूक याने 23 व्या मिनिटाला जबरदस्त गोल गेला. हा यंदाच्या विश्वचषकातील 50 वा गोल होता.
12 वर्षानंतर फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा विजय
ट्युनेशियाचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं स्पर्धेतील आपलं आवाहन कायम ठेवलं आहे. फिफा विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा तिसरा विजय होय. फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा आजचा 18 वा सामना होता. त्यापैकी त्यांना तीन सामन्यात विजय मिळवता आला तर 11 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चार सामने ड्रॉ राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाला फिफा विश्वचषकात 2006 मध्ये पहिला विजय मिळवता आला होता. त्यावेळी त्यांनी जपानचा पराभव केला होता. त्याशिवाय 2010 मध्ये ऑस्ट्रेलियानं सार्बियाचा पराभव केला होता. 2006 मध्ये फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ प्री-क्वार्टर फायनल पर्यंत पोहचला होता. ही त्यांची फिफा विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट कामहगिरी होय. यंदा ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ -
मॅथ्यू रयान (कर्णधार गोलकीपर), काई रोल्स, फ्रॅन करासिक, अजीज बेहिच, हॅरी सौतार, आरोन मोय, रिले मॅकग्री, जॅक्सन इरविन, मॅथ्यू लेकी, क्रेग गुडविन, मिशेल ड्यूक
ट्युनिशियाचा संघ -
आयमन डाहमेन (गोलकीपर), मोंटसार तल्बी, डायलन ब्रॉन, यासीन मेरिया, मोहम्मद ड्रॅगर, अली आब्दी, आइसा लॅडौनी, एलीस स्कीरी, नईम स्लिटी, इस्साम जबाली, यूसुफ मसकनी (कर्णधार)