News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

Cristiano Ronaldo: सौदी अरेबियाच्या क्लबकडून रोनाल्डोला कोटींची ऑफर; रक्कम पाहून भुवया उंचावतील

Football World Cup 2022: स्टार फुटबॉलपटू आणि मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) माजी खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाक्लबकडून (Saudi Arabia) मेगा मनी ट्रान्सफर ऑफर मिळाली आहे.

FOLLOW US: 
Share:

Football World Cup 2022: स्टार फुटबॉलपटू आणि मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) माजी खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाक्लबकडून (Saudi Arabia) मेगा मनी ट्रान्सफर ऑफर मिळाली आहे. फुटबॉल विश्वचषकादरम्यान 37 वर्षीय रोनाल्डोनं मँचेस्टर युनायटेडची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. रिपोर्ट्सनुसार, त्यांचे प्रतिनिधी जॉर्ज मेंडिस यांना एक मोठी ऑफर देण्यात आली. सौदी क्लब अल-नासरनं रोनाल्डोला तीन वर्षांच्या कराराची ऑफर दिलीय. त्याला 18.6 कोटी पौंड स्टर्लिंग म्हणजे सुमारे 1800 कोटी रुपयांची ऑफर मिळालीय.

रोनाल्डोनं मँचेस्टर युनायटेडसाठी आतापर्यंत 346 सामने खेळले असून 145 गोल केले आहेत. त्यानं मँचेस्टरसाठी दोन वेळा खेळलं आहेत. पार्तुगालचा कर्णधार रोनाल्डोनं 2009 साली पहिल्यांदा रियाल माद्रिदमध्ये सामील होण्यासाठी हा क्लब सोडला होता. त्यानंतर स्पेन क्लब माद्रीदसाठी खेळताना त्यानं अनेक विक्रमाला गवसणी घातलीय. या कालावधीत त्यानं पाचवेळा बॅलोन डी ओरचा खिताब जिंकलाय. माद्रिदनंतर रोनाल्डो इटलीच्या जुव्हेंट्स क्लबशी जुडला. तो तीन वर्ष जुव्हेंट्स क्लबकडून खेळला. यानंतर रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडशी जुडला. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा पाचवा फुटबॉल वर्ल्डकप आहे. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये त्यानं आतापर्यंत चांगली कामगिरी केलीय. याचदरम्यान, अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीदेखील फ्रान्स क्बल पेरिस सेंट जर्मनपासून वेगळं होण्याची शक्यता आहे. मेसीनं वर्ल्डकपमध्ये  8 गोल केले आहेत. 

रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप
पीयर्स मोर्गनच्या अनसेंसर्ड टीवी शोमध्ये एरिक टेन हॅगबद्दल म्हणाला की, "माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर नाही, कारण तोही माझा आदर करत नाही. जर तुम्हाला माझ्याबद्दल आदर नसेल तर, मलाही तुमच्याबद्दल कधीही आदर वाटणार नाही.  फक्त प्रशिक्षकच नाही तर, क्लबमध्ये असे आणखी दोन-तीन लोक आहेत", असं रोनाल्डो म्हणाला. क्लबच्या वरिष्ठ क्लब एक्झिक्युटिव्हला त्याला बाहेर काढायचं आहे का? असं रोनाल्डोला विचारण्यात आलं. यावर रोनाल्डोनं उत्तर दिलं की, 'हो मला वाटतं की माझी फसवणूक झालीय आणि मला असंही वाटतं की काही लोक मला येथे पाहू इच्छित नाहीत. ही केवळ या वर्षीची गोष्ट नाही, तर मागील वर्षीही असंच काहीसं घडलं होतं."

हे देखील वाचा-

Published at : 28 Nov 2022 04:05 PM (IST) Tags: Cristiano Ronaldo Manchester United Football World Cup 2022 Saudi Arabia club Al Nassr

आणखी महत्वाच्या बातम्या

EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले? 

EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले? 

EURO 2024 : फ्रान्सचा कॅप्टन किलियन एमबाप्पेचं नाक फुटलं पण लढत राहिला, ऑस्ट्रियाला 1-0 नं पराभूत करुनच थांबला 

EURO 2024 : फ्रान्सचा कॅप्टन किलियन एमबाप्पेचं नाक फुटलं पण लढत राहिला, ऑस्ट्रियाला 1-0 नं पराभूत करुनच थांबला 

Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना

Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

टॉप न्यूज़

Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका

Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा