एक्स्प्लोर

VVS Laxman : झिम्बॉब्वे दौरा संपताच लक्ष्मणचा मोठा निर्णय, राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल, 'त्या' जबाबदारीतून मुक्त होणार

VVS Laxman : राहुल द्रविड पाठोपाठ व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनं मोठा निर्णय घेतला आहे. झिम्बॉब्वे दौरा संपल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली : भारतानं(Team India ) वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावलं. भारतीय क्रिकेटमध्ये या विजेतेपदासह स्थित्यंतराला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20  क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळं या तिघांची जागा भरुन काढणारे खेळाडू बीसीसीआयला शोधावे लागणार आहेत. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं टी 20 संघांचा कॅप्टन निवडावा लागणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ देखील टी 20 वर्ल्ड कपनंतर संपला. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची कारकीर्द श्रीलंका दौऱ्यापासून होणार आहे. हे सर्व घडत असताना व्हीव्हीएस लक्ष्मणनं (VVS Laxman) मोठा निर्णय घेऊ शकतो आहे. लक्ष्मणनं नॅशनल क्रिकेट अकादमीचं पद सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो. 

व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय

राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षक पद सोडल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण यानं बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचं प्रमुख पद सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो. व्हीव्हीएस लक्ष्मणचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. लक्ष्मणनं कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा नव्यानं करार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळं राहुल द्रविड पाठोपाठ व्हीव्हीएस लक्ष्मण देखील बीसीसीआयच्या एका जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लक्ष्मणनं नॅशनल क्रिकेट अकादमीचं प्रमुख पुढील काळात काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यासाठी त्यानं वैयक्तिक कारण असल्याचं म्हटलं आहे. 

एनसीएचं प्रमुखपद कुणाकडे जाणार? 

व्हीव्हीएस लक्ष्मणनं नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदावर काम करण्याबाबतच्या कराराचं नुतनीकरण करणार नसल्याचं कळवलंय. त्यामुळं राहुल द्रविडसोबत भारतीय संघाचं फलंदाजी प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या विक्रम राठोड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विक्रम राठोड यांचं नाव नॅशनल क्रिकेट अकादमीते प्रमुख म्हणून चर्चेत आहे.  

लक्ष्मणच्या मार्गदर्शनात मालिका विजय

भारतीय क्रिकेट संघाची यंग ब्रिगेड नुकतीच झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर होती. झिम्बॉब्वे दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे देण्यात आलं होतं. या यंग ब्रिगेडच प्रशिक्षक म्हणून जबाबदारी व्हीव्हीवएस लक्ष्मणवर देण्यात आली होती. भारतानं झिम्बॉब्वेविरुद्धची मालिका 4-1 अशी जिंकली. पहिल्या टी 20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं पलटवार करत मालिका 4-1 अशी जिंकली. आता भारतीय संघ तीन टी 20 मॅच आणि तीन वनडे मॅचसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 

संबंधित बातम्या :

गंभीर पाठोपाठ रोहित शर्मा सूर्याच्या बाजूनं मैदानात, टी 20 चा कॅप्टन कोण? सूर्यकुमार की हार्दिक पांड्या?
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget