(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SA vs AUS : किक्रेटच्या इतिहासातील ऐतिहासिक सामना! जेव्हा दक्षिण आफ्रिकेला 11/11/11 तारखेला 11:11 वाजता 111 धावांची गरज होती
Interesting Facts of Cricket : आजच्या दिवशी क्रिकेटमधील एक ऐतिहासिक सामना खेळला गेला. यामागचं कारण म्हणजे एक अतिशय दुर्मिळ योग. यामागची नेमकी कहाणी काय, सविस्तर जाणून घ्या.
South Africa vs Australia, 11 Nov 2011 : क्रिकेटच्या (Cricket) मैदानावर एकामागून एक असे अनेक ऐतिहासिक क्षण येत राहतात. क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा मोठे विक्रम (Records) रचले आणि मोडले जातात, ज्याची नोंद क्रिकेटमध्ये सोनेरी अक्षरांनी होती. क्रिकेटच्या खेळात असे अनेक अविस्मरणीय क्षणही येतात, जे कायम लक्षात राहतात. क्रिकेटच्या इतिहासातील अशीच एक घटना आजच्या दिवशी घडली होती. या दिवशी अतिशय दुर्मिळ योग जुळून आला होता. ही या सामन्या मागची रंजक गोष्ट ठरली, जी अनेकांच्या स्मरणात आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रंजक सामना
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) यांच्यात एक रंजक सामना क्रिकेटमध्ये आजतागायत चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अविस्मरणीय सामना 11 नोव्हेंबर 2011 रोजी घडला होता. 2011 मधील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात योगायोग जुळून आला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 236 धावांची गरज होती, 1 बाद 125 धावा असताना एक मनोरंजक स्थिती घडली. 11/11/2011 रोजी सकाळी 11:11 वाजता, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त 111 धावांची गरज होती.
नक्की काय घडलं?
नोव्हेंबर 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जबरदस्त सामना रंगला होता. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होता. त्यावेळी 11:11 वाजले होते. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 111 धावांची गरज होती. या दिवशीचा योगायोग म्हणडे 2011 मध्ये 11 व्या महिन्याच्या 11 व्या दिवशी 11 वाजून 11 मिनिटांनी आफ्रिकन संघाला विजयासाठी 111 धावांची गरज होती. या विचित्र योगायोगामुळे हा सामना चर्चेत राहिल होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी झाला होता. या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना जिंकला आणि ही कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.
क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच असा योगायोग
विशेष म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर असा योगायोग यापूर्वी कधीच घडला नव्हता. दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत घडलेली ही घटना त्यांच्यासाठी लकी ठरली. हा योगायोगाचा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. त्यावेळी संपूर्ण क्रिकेट विश्वात याची जोरदार चर्चा झाली होती. क्रिकेटविश्वातील प्रत्येकजण हा योगायोग दक्षिण आफ्रिकेसाठी खूप भाग्यवान मानतो. कारण, या सामन्यात त्यांनी कांगारूंचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत मालिका बरोबरीत सोडवली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :