अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांच्या घटस्फोटित पत्नीकडून 164550 कोटींचं दान, मॅकेंझी स्कॉटकडे किती संपत्ती राहिली?
MacKenzie Scott: अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची घटस्फोटित पत्नी मॅकेंझी स्कॉट या दरवर्षी 2 हजारहून अधिक बिगर नफा संस्थांना मदत करतात. अमेझॉनमध्ये त्यांची भागिदारी 4 टक्के इतकी आहे.

MacKenzie Scott: अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची घटस्फोटित पत्नी मॅकेंझी स्कॉट या त्यांच्या संपत्तीमधील काही रक्कम वेगवेगळ्या बिगर नफा संस्थांना दान करत आहेत. 2019 पासून आतापर्यंत त्यांनी त्यांच्या 35.6 अब्ज डॉलर्स संपत्तीपैकी 19 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ता दान केली आहे. सेंटर फॉर इफेक्टिव्ह फिलंथ्रॉपीनं याबाबत अहवाल सादर केला आहे. गेल्या सहा वर्षात 2000 हून अधिक बिगर नफा संस्थांना मॅकेंझी स्कॉट यांनी मदत केली आहे. यामुळं त्या संस्तांनी त्यांचं कामकाज चालवण्यासाठी बजेट वाढवलं, आवश्यक गोष्टी खरेदी केल्या, कर्मचाऱ्यांना चांगलं काम केल्याबद्दल पगार देखील दिला.
मॅकेंझी स्कॉट यांच्याकडे अमेझॉनमधील 4 टक्के भागिदारी
मॅकेंझी स्कॉट यांनी 2019 मध्ये जेफ बेजोस यांच्याकडून घटस्फोट घेतला होता. त्यावेळच्या करारानुसार स्कॉट यांना अमेझॉनमध्ये 4 टक्के भागिदारी मिळाली होती. तेव्हा त्याचं मूल्य जवळपास 36 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं होतं. स्कॉट आणि बेजोस यांचं लग्न 25 वर्ष टिकलं. 2019 मध्ये दोघांनी ट्विटरवर घटस्फोटांच्या अटींची घोषणा केली अन् हस्ताक्षर देखील केलं. मॅकेंझी स्कॉट यांनी त्यांच्या संपत्तीच्या निम्मा वाटा दान करण्याचा निर्णय घेतला होता.
2450 हून अधिक एनजीओना मदत
फोर्ब्सनुसार मॅकेंझी स्कॉट यांची नेटवर्थ 32 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनात विचार केला असता 277027 कोटी इतकी आहे. मॅकेंझी पूर्व टेक्सास पासून उत्तर टांझानियामधील 2450 संघटनांना मदत करतात. ज्या शिक्षण, आरोग्य, परवडणारी घरे, स्थलांतर अशा मुद्यांवर काम करतात. त्यांनी 164550 कोटींचं दान केलं आहे.
सीईपीच्या रिपोर्टमध्ये स्कॉटनं म्हटलं होत की, मला ज्या लोकांची काळजी आहे,त्यांच्यासाठी काय करायचं हे त्यांना विचारण्याची गरज नाही. मी माझ्याकडे जे असेल ते शेअर करते.
स्कॉटच्या डोनेशनवर एलन मस्कची कमेंट चर्चेत
मॅकेंझी स्कॉट यांच्या डोनशनच्या सवयावीर टेस्लाचे संस्थापक आणि सीएओ एलन मस्क यांनी कमेंट केली आहे. मॅकेंझीकडून केली जाणारी डोनेशन हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं. स्कॉट यांचं लक्ष जगातील आवश्यक मुद्यांऐवजी स्थलांतरितांचे अधिकारी, एलजीबीटीक्यू ,वांशिक समानता याकडे अधिक दिसतं.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

