ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
संतोष देशमुख हत्याप्रकरणाची आज बीडमध्ये पहिली सुनावणी.. विशेष सरकारी वकील उज्वल निकमही उसस्थित राहणार, सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींची व्हीसीद्वारे हजेरी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, अधिवेशनात आज संविधानावर चर्चा, शिफारसीच्या वीस दिवसानंतरही विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का होत नाही यावरुन भास्कर जाधव आक्रमक
नागपूर हिंसाचाराचा सत्यशोधन अहवाल काँग्रेस मुंबईत आज राज्यपालांना करणार सादर, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून नागपूर दंगलीचा धांडोळा
न्यायालयाच्या स्थगितीमुळे नागपूर दंगलीतील आणखी चार आरोपींच्या घरावर बुलडोजर कारवाई लांबणीवर.. दंगलीचे आरोप झाल्यावर सूडाने कारवाईचा याचिकाकर्त्याचा आरोप
चौकशीला हजर राहण्याचं समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर.. कामराकडून सात दिवसांच्या मुदतीची मागणी, आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता.
राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन चर्चेत अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर शंका घेतल्याने शाह आक्रमक.. काँग्रेसच्या काळात एकाच कुटुंबाकडे मदतनिधीची मालकी, शाहांचा आरोप
वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरात आज निदर्शने.. पाटण्यातून होणार देशव्यापी निदर्शनाची सुरुवात, सर्व खासदारांना विधेयकाची माहिती देणार सरकार





















