सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 25 लाखाचं बक्षीस असलेल्या जहाल नक्षली रेणुकाचा खात्मा
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावरती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावरती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 25 लाख इनाम असलेल्या रेणुका उर्फ बानूचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. छत्तीसगड पोलिसांचे डीआरजी पथक आज सकाळी नक्षलविरोधी अभियानावर होते. यावेळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रेणुकाचा खात्मा केला आहे.
दरम्यान, घटनास्थळावरुन INSAS रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शस्त्र तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आले आहे. ठार झालेली महिला नक्षली रेणुका ही वारंगल जिल्ह्यातील कडवेंडी गावातील रहिवासी होती. ती DKSZ आणि SZCM ची प्रेस टीम प्रभारी होती. घटनास्थळावर आताही चकमक सुरू असून आणखी काही नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. शनिवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 17 तर 20 मार्च रोजी विजापूर, दंतेवाडा, कांकेर येथे झालेल्या चकमकीत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते.
गेल्या आठवड्यात 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश
नक्षली कारवायांसाठी सातत्याने चर्चेत असेलल्या छत्तीसगडमधील बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन चकमकीत 30 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. विजापूरमध्ये 20 आणि कांकेरमध्ये 10 नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा रक्षकांकडून स्वयंचलित शस्त्रांसह या नक्षलवाद्यांचे सर्व मृतदेह जप्त करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यात आली होती. दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटर पथकाने 3 नक्षलवाद्यांना ठार केले होते. विशेष म्हणजे या कारवाईत नक्षल नेते सुधीर उर्फ मुरलीचा खात्मा झाला आहे. नक्षलवादी मुरलीवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते, त्याला ठार करण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. त्यानंजर आज पुन्हा जहाल नक्षली रेणुकाचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई























