एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप कसं वापरणार?

1/8

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली. नवी दिल्लीत 'डिजीधन मेला' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भिम अॅप लाँच केलं.
2/8

बँक खात्यातील रक्कम देखील अॅपमध्ये पाहता येईल.
3/8

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल व्यवहारांसाठी भिम हे अॅप लाँच करण्यात आलं आहे. भिम अॅपच आता तुमची बँक असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केलं आहे.
4/8

भिम अॅपद्वारे पैशाची देवाण-घेवाण कशी करावी? : • भिम अॅपद्वारे युझर्स पैसे पाठवू शकतात, किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेऊही शकतात. • एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येऊ शकतात. • यासाठी अॅपमध्ये इंग्रजी भाषेत सेंड किंवा रिसीव्ह मनी असा पर्याय देण्यात आला आहे.
5/8

या बँकांचा भिम अपमध्ये समावेश : अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, अक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कॅथोलिक सीरियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डीसीबी बँक, देना बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडस्लँड बँक, कर्नाटका बँक, करुर बँक, कोटक महिंद्रा बँक, ओरिएंटल बँक, पंजाब नॅशनल बँक, आरबीएल बँक, साऊथ इंडियन बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक, या बँका सध्या भिम अपमध्ये उपलब्ध आहेत.
6/8

• तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल. • मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भिम अॅपचा वापर करता येईल. • इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.
7/8

भिम अॅप कसं वापरणार? : • अँड्रॉईड स्मार्टफोनवर भिम अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. • त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)
8/8

या अॅपमुळे गरिबांना व्यवहार सोपे होणार आहेत. केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. एवढंच नाही, तर हे अॅप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल, असंही मोदींनी सांगितलं.
Published at : 30 Dec 2016 06:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
