एक्स्प्लोर

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतील घवघवीत यश मिळालं असून तब्बल महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 237 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकांचा हा निकाल अनेकांना आश्चर्यचकीत करणार असून भाजपमधील अनेक पदाधिकारी व नेत्यांनीही बहुमत अपेक्षित होतं, पण एवढं अपेक्षित नव्हतं, असं म्हटलंय. त्यामुळे, या निकालावर अनेक बाजुंनी शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवसेना युबीटी नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलंय. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला मान्य आहे का, असा सवाल करत ईव्हीएमवर (EVM) संशय व्यक्त केला आहे. आता, पराभूत आमदारांच्या बैठकांमध्ये देखील निकालावरुन नाराजी व संशयाचा सुर उमटत असल्याचे पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही ट्वटि करुन हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, अशा आशयाची पोस्ट करत 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70 पेक्षा जास्त आमदारांचा पराभव झाल्याने ही बाब चिंताजनक असल्याचं पक्षाला वाटत आहे. त्यातूनच आज सर्वच पराभूत आमदारांची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये, बहुतांश आमदारांनी ईव्हीएममवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली. यावेळी, आमदारांनी बैठकीत ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला, महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारानी भूमिका घ्यावी अशी देखील विनंती या आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, आता शरद पवार नेमकं काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. 

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड स्वत: एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आले असले तरी त्यांनी देखील ईव्हीएम बाबत रोष व्यक्त केला आहे. त्यातचून, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादीच ट्विटरवरुन शेअर केली आहे. तसेच, हे बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल अशा आशयाचे ट्विट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी आणि सारखेपण

सुहास कांदे 138068 
माणिकराव कोकाटे 138565 
नरहरी झिरवाळ 138622 
छगन भुजबळ 135023

हिरामण खोसकर 117575
नितीन पवार 119191
दिलीप बनकर 120253

राहुल ढिकले 156246 
दादा भुसे 158284 
दिलीप बोरसे 159681

देवयानी फरांदे 105689 
डॉ.राहुल आहेर 104826

हेही वाचा

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Embed widget