एक्स्प्लोर
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Udayanraje: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
Udayanraje meeting with Devendra Fadnavis
1/7

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
2/7

महायुतीच्या यशाबद्दल दादांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देत सत्कार केला. याप्रसंगी कराडचे आमदार अतुल भोसले हेही उपस्थित होते. त्यावेळी, अजित पवारांनीही उदयनराजेंचं स्वागत करत आभार मानल.
3/7

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला दैदीप्यमान यश मिळालं असून 288 पैकी 237 जागांवर भाजप महायुतीने विजय मिळवला आहे. त्याबद्दल सर्वच स्तरातून महायुतीच्या प्रमुख नेत्यांचं अभिनंदन केलं जात आहे.
4/7

खासदार उदयनराजे भोसले यांनीही आज महायुतीमधील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन व सत्कार केला. अगोदर अजित पवार, त्यानंतर सागर बंगल्यावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाही सत्कार उदयनराजेंकडून करण्यात आला.
5/7

विशेष म्हणजे या भेटीनंतर शिवेंद्रराजेंच्या मंत्री पदासाठी खा.उदयनराजे सरसावले पुढे सरसावल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे. उदयनराजेंनी 5 आमदारांसह खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केलं आहे.
6/7

कोरेगावचे आ.महेश शिंदे, कराड उत्तरचे आ.मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आ.अतुल भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह खा.उदयनराजे भोसले यांनी घेतली भेट
7/7

शिवेंद्रराजेंना मंत्री करा, मी स्वतः सातारा जिल्ह्यात आणखी भाजपची वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा शब्दच खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणीसांना दिला आहे.
Published at : 26 Nov 2024 05:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























