एक्स्प्लोर

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. 

Maharashtra CM मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपुर्द केला. मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलं आहे. यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव पुढे करण्यात येत आहे. भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही असताना शिवसेना पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहे. 

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होण्याची शक्यता आहे, मात्र त्याआधीच दोन्ही बाजूकडून दबाव निर्माण केला जात आहे. राज्यात भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय छोट्या पक्षांतील 5 आमदार आणि अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे व अशोक माने, युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा, अपक्ष शिवाजी पाटील या आमदारांचा समावेश आहे. या अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपचे विधानसभेतील संख्याबळ 137 वर पोहोचले असून त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. 

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे होणार? ( How will Devendra Fadnavis become the CM of Maharashtra )

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप पक्षाची संयुक्त बैठक बोलावावी लागणार आहे. या बैठकीत भाजपच्या सर्व मित्रपक्षांच्या आमदारांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी द्यावी लागणार आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे पत्र राज्यपालांना द्यावे लागणार आहे. त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होईल.

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर शिंदे गटाचा दावा का? 

एकीकडे भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरत असले तरी दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नावावर ठाम आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली होती. लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला होता. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने चांगलीच बाजी मारली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला विधानसभेत मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा देखील महायुतीला फायदा झाल्याचं दिसून आले. एकनाथ  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 57 जागा जिंकल्या. तर जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे आणि शिरोळमधून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ 59 झाले आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरत आहे.

संबंधित बातमी:

अजित पवारांनी टायमिंग साधलं, देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवलं, राजभवनात काय घडलं?, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget