एक्स्प्लोर
विराट कोहली की रोहित शर्मा, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा आवडता खेळाडू कोण? उत्तर देत म्हणाल्या...
IPL 2024 Virat Kohli : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच होणार आहे. बंगळुरु आणि दिल्लीसाठी ही मॅच महत्त्वाची आहे.

सोनाली बेंद्रे यांचा आवडता खेळाडू कोण?
1/6

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना त्यांचा आवडता क्रिकेटर कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांच्यापुढं विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन पर्याय ठेवण्यात आले होते.
2/6

विराट कोहली जगभरातील टॉप क्रिकेटरपैकी एक मानला जातो. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत आयपीएलमध्ये देखील दमदार कामगिरी करत आहे. कोहलीला कोट्यवधी चाहते फॉलो करत असतात. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या विराट कोहली आवडता क्रिकेटर असल्याचं सांगतात त्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा देखील समावेश आहे.
3/6

सोनाली बेंद्रे यांनी काही दिवसांपूर्वी शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांना रोहित शर्मा की विराट कोहली यापैकी त्यांचा आवडता खेळाडू कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी विराट कोहलीचं नाव घेतलं.
4/6

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर त्यांना चाहते फॉलो करतात. कोहलीचे इन्स्टाग्रामवर 268 मिलियन फॉलोअर्स आहेत.
5/6

सोनाली बेंद्रे यांनी विराट कोहलीमुळं इन्स्पायर असल्याचं म्हटलं. अनुष्का देखील आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं.विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी चांगली वाटते, असं त्या म्हणाल्या.
6/6

विराट कोहीलनं यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विराटच्या नावावर 12 मॅचमध्ये 634 धावा आहेत. यामध्ये त्यानं एक शतक आणि पाच अर्धशतकं लगावली आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप सध्या विराट कोहलीकडे आहे. विराटनं या हंगामात सर्वाधिक धावा केल्यात.
Published at : 12 May 2024 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
करमणूक
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
