एक्स्प्लोर
MI vs KKR : मुंबई इंडियन्सच्या हातून मॅच केव्हा निसटली, फलंदाजांची एक चूक ठरली कारणीभूत? केकेआरनं डाव कुठं पलटवला?
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला कोलकाताविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबईचा हा नववा पराभव ठरला.

मुंबई इंडियन्सच्या हातून मॅच केव्हा निसटली?
1/5

कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सला 18 धावांनी पराभूत केलं. पावसामुळं मॅचमधील ओव्हरची संख्या 16 करण्यात आली होती. मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरला 7 विकेटवर 157 धावांवर रोखलं. मुंबईच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता न आल्यानं पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्यानं यासंदर्भात बोलताना म्हटं की आम्ही चांगला खेळ करु शकलो नाही. आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असून ते सध्या होत नाही. मुंबईचा संघ 8 विकेटवर 139 धावा करु शकला.
2/5

रोहित शर्माचा आयपीएलच्या गेल्या काही मॅचेसमधील फॉर्म देखील चिंतेचा विषय आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशननं मुंबईला सावध सुरुवात करुन दिली होती. मात्र, रोहित शर्मा 24 बॉलमध्ये केवळ 19 धावा करु शकला.
3/5

मुंबई इंडिन्सकडून ईशान किशननं 40 तर तिलक वर्मानं 32 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय मुंबईचे इतर खेळाडू 30 धावांचा टप्पा ओलांडू शकले नाहीत.
4/5

मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं ते म्हणजे फलंदाजांच्या चांगल्या आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव होय. मुंबईनं पॉवरप्लेमध्ये 62 धावा केल्या होत्या. यानंतर पुढील दोन ओव्हरमध्ये मुंबईला दोन धक्के बसले. ईशान किशन आणि रोहित शर्मा अनुक्रमे सातव्या आणि आठव्या ओव्हरमध्ये बाद झाले. यानंतर मुंबईची फलंदाजी गडगडली. सूर्यकुमार यादव देखील केवळ 11 धावा करु शकला. मुंबईच्या आक्रमक फलंदाजांचं फारसं समाधानकारक नव्हतं.
5/5

मुंबई इंडियन्सची फलंदाजी रोहित शर्मा आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर गडगडली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर मुंबईच्या संघानं पंधराव्या ओव्हरचा अपवाद वगळता प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट गमावली. त्यामुळं सुरुवातीच्या 6 ओव्हरमध्ये मुंबईच्या ताब्यात असणारी मॅच केकेआरनं हिसकावून घेतली. जसप्रीत बुमराहनं मुंबईसाठी चांगली गोलंदाजी केली. त्यानं चार ओव्हरमध्ये 39 धावा देत 2 विकेट घेतल्या. बुमराह पर्पल कॅपचा मानकरी ठरला.
Published at : 12 May 2024 07:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
