Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Aaditya Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) निर्धार शिबिर ईशान्य मुंबईतील कालिदास नाट्यगृहात पार पडले. या शिबिरात ठाकरेंच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केला. जुने भाजपवाले अजूनही सांगतात की आपलं सरकार आलं कसं? असे म्हणत त्यांनी भाजपवरही (BJP) निशाणा साधला. तसेच लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) यश आणि विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पराभवावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केले आहे.
निर्धार शिबिरात आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकल्यानंतर शिबीर इथेच थांबायला पाहीजे. मास्टर क्लास झाल्यानंतर आपण काय बोलायचं? रावते साहेब यांनी आमच्या चार पिढ्यासोबत काम केले आहे. रावते साहेबांसोबत हाऊसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी मंत्री असताना तिथे बोलताना एक जरी शब्द इकडे तिकडे झाला तरी त्यांचा फोन यायचा. रावते साहेब यांनी मराठवाड्यात काम केले. मुंबईत राहणाऱ्या नेत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी काम केले. देसाई साहेब यांचा अनुभव मला हा दावोसला आला होता. प्राणायाम, व्यायाम आमच्या बदली पण ते करायचे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई यांनी पक्षात जबाबदारी घेतली. राजन विचारे यांना किती दबाव दिला जातोय हे सर्वांनी सांगितलं. राजन विचारेंना त्रास दिला पण उभे राहिले ते म्हणजे राजन विचारे. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ आहे. त्यात स्टीव वॉ आणि मार्क वॉ हे दोन बंधू आहेत. आपल्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या तसे सुनील राऊत आणि संजय राऊत आहेत, असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधानांसोबत फिरण्यापेक्षा राऊत काकांसोबत दिल्ली फिरायला बरं वाटतं
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मी घरी आल्यावर आई बाबांना सांगितलं की, पंतप्रधानांसोबत फिरण्यापेक्षा राऊत काकांसोबत दिल्ली फिरायला बरं वाटतं. राऊत काका पुढे आहेत म्हणून बोलत नाही. यांनी सत्तेत न राहता आपली ओळख बघायची असेल तरी दिल्लीला राऊत साहेबांसोबत फिरा. भाजपचे काही खासदार देखील बाजूला सांगतात की राऊतजी ठीक चल राहा है. पत्रकार देखील त्यांना सांगतात की व्यवस्थित आहे.
अजूनही जुने भाजपवाले सांगतात की आपलं सरकार आलं कसं?
लोकसभेत आपलं यश आपण मानतो. त्यानंतर पदवीदर आणि सिनेट निवडणूक आपण जिंकलो. विधानसभा निवडणुकीत वोटर फ्रॉड झाला तो आपण समोर आणत आहोत. इथून पुढे मुंबई, ठाणे, नागपूरला जाऊन लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. 2022 ला या गद्दारांनी सरकार पाडलं. त्यावेळी त्यांनी सरकार बनवलं पण आता सरकार त्यांच आलंय, हा विश्वासच त्यांना बसत नाही. अजूनही जुने भाजपवाले सांगतात की आपलं सरकार आलं कसं? वाजपेयी साहेबांच्या काळातील नेते सांगतात. या नेत्यांना शॉक बसला की सरकार आलं कसं? आताचे भाजपवाले आहेत ते कॉन्ट्रॅक्टवाले भाजपवाले राहिलेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
...तर मुंबईचा आणखी विकास झाला असता
मुंबईत अनेक काम आपण केली आहेत. त्याच उदघाटन हे आता करत आहेत. कोस्टलला कुठेही मला उभं करा, मी इंच इंचची माहिती देऊ शकतो. आम्ही प्रत्येक वेळी मिटिंगला जायचो. कोस्टल रोड झाल्यामुळे दिड तासाचा वेळ पंधरा मिनिटावर आला आहे. विधानभवनात जाताना मी उद्धव साहेबांना सांगतो की, तुमच्यामुळे मी विधानसभेत लवकर पोहचू शकतो. कोस्टल रोडच काम लवकर पूर्ण झालं पाहिजे होतं. अटल सेतू लवकर यांनी केला नाही. माझं दुःख एवढं आहे की, पाच वर्ष आपलं सरकार राहील असतं तर मुंबईचा आणखी विकास झाला असता, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंची मिमिक्री
मुंबईला आपल्या शिवसेनेचा महापौर का हवाय? ते मी सांगतो. रस्ता घोटाळा एवढा सुरु आहे. त्याबद्दल वारंवार मी बोलत आलो आहे. BMC एवढे रस्ते खोदत आहेत की त्यांना काहीतरी मिळणार आहे म्हणून ते रस्ते खोदत आहेत. त्यांचे सरकार आले आणि म्हणायला लागले आम्ही मुंबईला खड्डे मुक्त करू. अजून खड्डे मुक्त मुंबई झाली नाही. यांच पद गेलं, पण मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली.
आणखी वाचा
























