एक्स्प्लोर
SRH New Song Launched: हैदराबादच्या खेळाडूंचं नव गाणं लॉन्च!

(Photo Credit: Twitter)
1/6

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) चांगली कामगिरी करून दाखवली आहे. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात हैदराबादच्या संघानं पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढील चार सामने जिंकत जोरदार कमबॅक केलं आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
2/6

हैदराबादचा पुढील सामना 23 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याशी होणार आहे. आरसीबीच्या संघानंही या हंगामात चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्यांनी सात पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. यातच हैदराबादच्या संघानं नवीन गाणं लॉन्च केलं आहे. ज्याचा व्हिडिओ राजस्थानच्या संघानं ट्विटरवर शेअर केलं आहे.
3/6

आरसीबीविरुद्ध सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघानं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ कर्णधार केन विल्यमसनसह हैदराबादचे सर्व खेळाडू दिसत आहेत. केन विल्यमसनसह सर्व खेळाडू गाणं गातानाही दिसत आहेत. हे गाणं बिली जोएलच्या 'व्ही डोन्ट स्टार्ट द फायर' पासून प्रेरित आहे.
4/6

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हैदराबादच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, त्यानंतर पुढच्या चार सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जला पराभूत करून जोरदार कमबॅक केलं आहे.
5/6

हैदराबादचा वेगावान गोलंदाज उमरान मलिकनं उत्कृष्ट गोलंदाजीच्या जीवावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर खेळताना भल्या भल्या फलंदाजाला अडचणी येत आहेत. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरही त्याच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना दिसला आहे.
6/6

आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी हैदराबादच्या संघानं उमरान मलिकला चार कोटीत रिटेन केलं. या हंगामात त्यानं सहा सामने खेळले आहेत. ज्यात 22.33 च्या सरासरीनं 9 विकेट्स घेतले आहेत.
Published at : 23 Apr 2022 03:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
