एक्स्प्लोर
R Aswin Retirement: बाहेर मुसळधार पाऊस, तो काहीतरी बोलला अन्...; विराट अन् रोहितला अश्विनच्या निवृत्तीबाबत कळताच काय घडलं?
Ravichandran Aswin Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Ravichandran Aswin Retirement
1/8

भारताचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Aswin Retirement) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
2/8

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 700 हून अधिक विकेट्स घेतल्या.
3/8

सध्या खेळवण्यात येणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील तिसरा कसोटी सामना आज पावसामुळे रद्द झाल्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
4/8

पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना थांबवण्यात आला होता. यावेळी मुसळधार पाऊस सुरु असताना विराट कोहली आणि अश्विन यांच्यात काहीतरी बोलणं झालं.
5/8

विराट कोहलीला आर अश्विनने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती दिली असावी. यानंतर लगेच विराट कोहलीने अश्विनला मिठी मारली.
6/8

भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली.
7/8

रोहित शर्मासोबत या पत्रकार परिषदेत अश्विन देखील सहभागी झाला आणि यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केली. यानंतर रोहित शर्माने देखील अश्विनला भर पत्रकार परिषदेत मिठी मारली.
8/8

भारत आणि ऑस्ट्रेलियातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता पुढील सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.
Published at : 18 Dec 2024 12:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
