एक्स्प्लोर
PHOTO : BMC च्या वाहनाची टाकी फुटल्याने डिझेल रस्त्यावर; पाणी, माती टाकून रस्ता मोकळा
मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्ती वाहनाची डिझेल टाकी फुटल्याची घटना आज ठाण्यात घडली. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पाणी मारल्यानंतर माती टाकून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

BMC Vehicle Diesel Tanker Burst
1/8

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्ती वाहनाची डिझेल टाकी फुटल्याची घटना आज ठाण्यात घडली.
2/8

आज सकाळी 7.48 च्या सुमारास ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कॅडबरी ब्रिज ही घटना घडली.
3/8

टाकी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल पसरल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
4/8

अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पाणी मारल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर माती टाकून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.
5/8

या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
6/8

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिघाड दुरुस्ती वाहन कापूरबावडी इथून भांडुपला जात होतं.
7/8

ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील कॅडबरी ब्रिजवरुन जाताना वाहनाची डिझेल टाकी फुटली
8/8

यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान आणि रेस्क्यू वाहनासह दाखल झाले.
Published at : 16 Dec 2022 12:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
