एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Birthday : ना फॉरेन, ना युके... बड्डेला धरली कोकणाची वाट; गप्पा-गाण्यांची मैफिल ते मालवणी पदार्थांवर ताव...
वाढदिवस साजरा करण्यासाठी क्रिकेट च्या देवाने सहकुटुंब वाट धरली ती थेट तळ कोकणातल्या परुळ्यात...

Sachin Tendulkar Birthday
1/17

आक्ख जग तुम्हाला 'क्रिकेटचा देव' मनातं, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपण अव्वल स्थानावर आहोत...
2/17

असं असताना साहजिकच वाटेल आपला 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कधी स्वप्नवत विचार केलाही नसेल असं सेलिब्रेशन आपण करू शकतो, 'पैश्याची कसली कमी नाही...' अगदी मनात आलं तर अवकाश चंद्र-तारेचं काय तर जगाला हेवा वाटेल असं काहीही करता येऊ शकतं...
3/17

असं असताना साहजिकच वाटेल आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कधी स्वप्नवत विचार केलाही नसेल असं सेलिब्रेशन आपण करू शकतो, 'पैश्याची कसली कमी नाही...'
4/17

मात्र, या सगळ्या गोष्टीना फाटा देत क्रिकेट च्या देवाने सहकुटुंब वाट धरली ती थेट तळ कोकणातल्या परुळ्यात...
5/17

आणि खवय्या सचिनने अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर मारला यथेच्छ ताव...
6/17

भरलेला बांगडा, कोळंबी फ्राय, 'माशाचा मालवणी तिखला,' कोंबडी रस्सा, वडे-सागोती, गोलमा अशा अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर यथेच्छ ताव मारत 'क्रिकेटच्या देवा'ने अर्थात खवैय्या सचिन तेंडुलकरने या मालवणी भोजनाला दिलखुलास ताव मारला.
7/17

परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर आणि सचिनच्या मित्रांनी भेट दिल्याचं पाहायला मिळालं
8/17

आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भोगवे गावात आलेल्या सचिनने खास मालवणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
9/17

आणि खवय्या सचिनने अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर मारला यथेच्छ ताव...
10/17

शाकाहारी पदार्थांमध्ये आमरसासह हापूस आंबे तसेच कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, कंद मुळाची भाजी..
11/17

काजू-शहाळ्याची भाजी, भात, सोलकढी, निरफणसाची कापे, बोंडू रायता अशा पदार्थांचीही यावेळी रेलचेल होती.
12/17

सचिनने कुटुंबियांसह मित्रमंडळींनी गाण्यांच्या मैफिलीसह आनंद लुटला.
13/17

तश्याच पद्धतीचा लूक हॉटेल ला देऊन बनवलेलं हे माचली रेस्टॉरंट. हे माचली रेस्टॉरंट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावात आहे.
14/17

याच माचली रेस्टॉरंटमध्ये सचिन तेंडुलकरनेही मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला.
15/17

सचिनचे कुटुंब आणि मित्र मिळून एकूण तीस जणांनी या पंक्तीत एकत्र जेवण घेतले.
16/17

सचिनने कुटुंबियांसह मित्रमंडळींनी गाण्यांच्या मैफिलीसह आनंद लुटला. सचिनने माचली रिसॉर्ट फिरून पाहिले आणि समाधान व्यक्त केले.
17/17

दिवसभर सचिन मित्रांच्या गराड्यात गप्पांमध्ये रमला होता, असा वाढदिवस कोणाला नकोय... सचिनची नाळ या आपली मातीत जुळली आहे, याचा प्रत्यय आलेला दिसला...
Published at : 25 Apr 2023 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
