एक्स्प्लोर

Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश

Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : नागरिकांनी घेराव घालत गावातील लहान मुलांचा जीव धोक्यात असून पाण्याची पाहणी करा, अशी मागणी लावून धरली. गाव धोक्यात पळून जावू नका, पाहणी करा अशी मागणी केली.

Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा (GBS) पुण्यात उद्रेक झाल्याने (Guillain-Barre Syndrome outbreak in Pune) जिल्ह्यातील बाधित गावांचा आक्रोश सुरु आहे. आज (29 जानेवारी)बाधित गावांची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर पाहणी न करताच परतून जात असलेल्या केंद्रीय पथकाला बाधित झालेल्या गावातील गावकऱ्यांनी घेराव घालत एकच आक्रोश केला. यावेळी गावकऱ्यांनी बाधित झालेल्या पाणवठ्यांची पाहणी करा, म्हणत प्रश्नांची सरबत्ती केली.  

गाव धोक्यात पळून जावू नका, पाहणी करा

जीबीएस फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागातही शिरकाव झाला आहे. नांदेडमधील नागरिकांनी घेराव घालत गावातील लहान मुलांचा जीव धोक्यात असून पाण्याची पाहणी करा, अशी मागणी लावून धरली. गाव धोक्यात पळून जावू नका, पाहणी करा अशी मागणी केली. यावेळी मनपा पथकासमवेत मनपा कर्मचारी होते. दरम्यान, गावकऱ्यांनी घेराव घालताच केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आता काहीच माहिती नसून माहिती घेतल्यानंतर सविस्तरपणे सांगू अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, 9 जानेवारी रोजी पुण्यातील रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णाची चाचणी GBS पॉझिटिव्ह आली, ही पहिलीच केस होती. पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे.त्यापैकी 19 रुग्ण हे 9 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 50-80 वयोगटातील 23 रुग्ण आहेत.

केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली

केंद्र सरकारने जीबीएसच्या बाबतीत मदत करण्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ टीम पाठवली आहे. आरोग्य मंत्रालयाने 7 सदस्यांची टीम पाठवली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, संशोधन आणि इतर विभागातील तज्ज्ञ पथके काम करत आहेत.

बॅक्टेरिया हे सिंड्रोमचे मुख्य कारण 

दुसरीकडे, सिंड्रोमचा पहिला रुग्ण 9 जानेवारी रोजी आढळला होता. त्याच्या नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया असल्याचे चाचण्यांमधून समोर आले. हा जीवाणू जगभरातील एक तृतीयांश GBS प्रकरणांमध्ये आढळला आहे. जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी रविवारी पुण्यात पाण्याचे नमुने घेतले होते. येथे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया सापडल्याबद्दल कोणतीही माहिती नाही. पुण्यातील मुख्य जलसाठा असलेल्या खडकवासला धरणाजवळील विहिरीत ई कोलाय या जीवाणूची पातळी खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. विहिरीचा वापर सुरू आहे की नाही हे स्पष्ट नाही. अधिकाऱ्यांनी लोकांना पाणी उकळून प्यावे आणि थंड अन्न खाणे टाळावे असा सल्ला दिला आहे. फक्त गरम अन्न खा, असेही आवाहन करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 25,578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साधारणत: एका महिन्यात फक्त 2 जीबीएस रुग्णांची नोंद होते. तथापि, अचानक ही संख्या वाढली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Hotel CCTV :आरोपींसोबत API, हॉटेलमधील CCTV, 50 दिवसांनी धनंजय देशमुख म्हणाले..Mahakumbh Mela Stampede : पत्नी आणि नातेवाईक हरवले..,मी पडलो, माझ्या अंगावरुन लोक गेलेCM Yogi Adityanath On stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 29 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Embed widget