एक्स्प्लोर
Mahabaleshwar Weather : वेण्णा लेक, महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात पर्यटक गारठले...
Satara Weather : महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. महाबळेश्वरसह वेण्णा लेक परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे.

Mahabaleshwar Weather
1/11

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे.
2/11

अशातच आता सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे.
3/11

महाबळेश्वरसह (Mahabaleshwar) वेण्णा (Venna) लेक परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे. अचानक तिथला पारा घसरला आहे
4/11

वेण्णा लेकमध्ये तापमानाचा पारा सहा अंशावर तर महाबळेश्वरचा पारा नऊ अंशावर गेला आहे.
5/11

दरम्यान, अचानक तापमानाचा पारा घसरल्यामुळं पर्याटकांसह स्थानिकही चांगलेच गारठले आहेत. ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हिवाळ्याचा अनुभव येत आहे.
6/11

दरम्यान, एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat wave) शक्यता भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) दिली आहे.
7/11

एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
8/11

मात्र सरासरी एप्रिल ते जून महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे.
9/11

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे.
10/11

महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
11/11

त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
Published at : 03 Apr 2023 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
