एक्स्प्लोर

Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस

Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करायचं असल्यास अर्ज करण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी आहेत. अर्ज कसा आणि कुठे करायचा जाणून घ्या.

नवी दिल्ली : इंडियन आर्मीमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर म्हणून काम करायचं असल्यास पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी येत्या 10 एप्रिलपर्यंत भारतीय सैन्यदलाच्या वेबसाईटवर अर्ज करणं आवश्यक आहे. 

इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करायचं असल्यास www.joinindianarmy.nic.in  या वेबसाईटवरील जाहिरात वाचून घ्यावी. तर, https://joinindianarmy.nic.in/jco-or-enrollment.htm   या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत. 

अग्नीवीर जनरल ड्युटी,अग्नीवीर  टेक्निकल, अग्नीवीर  क्लार्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्नीवीर ट्रेडसमन, अग्नीवीर वुमन जनरल ड्युटी इन कॉर्पस ऑफ मिलिटरी पोलीस यापैकी पात्र उमेदवारांना दोन कॅटेगरींसाठी अर्ज सादर करता येतील. 

अग्नीवीर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय साडे सतरा वर्ष ते 21 वर्षांच्या दरम्यान असावं. 1 ऑक्टोबर 2025 ही तारीख आधारभूत मानून किमान आणि कमाल वयोमर्यादा मोजली जाईल.  

केंद्र सरकारच्या  शिक्षण मंत्रालयानं मान्यता दिलेल्या बोर्डामधून दहावी उत्तीर्ण  झालेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. पुरुष उमेदवारांना 1.6 किमी धावणे, पुलअप्स याशिवाय इतर चाचण्या द्यावा लागतील. पुरुष उमेदवार हे अविवाहित असावेत. महिला उमेदवार देखील अविवाहित असणं अपेक्षित आहे. याशिवाय विधवा, घटस्फोटित आणि कायद्याने वेगळ्या झालेल्या महिला अर्ज करु शकतात. यासाठी काही नियम लागू असतील.

अग्नीवीर पदासाठी प्रवेश परीक्षा साधारणपणे जूनमध्ये घेतली जाईल. या संदर्भातील अंतिम तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. प्रवेश परीक्षा ही 13 भाषांमध्ये घेतली जाईल. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी सह इतर भाषा असतील. अग्नीवीर उमेदवारांना 30 दिवसांची रजा दरवर्षी दिली जाईल. या शिवाय आजारपणाच्या रजा वैद्यकीय स्थितीवर आधारित वैद्यकीय प्राधिकरणानं दिलेल्या सल्ल्यानुसार दिलं जाईल. 

अग्नीवीर म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी एकत्रित पॅकेज 30 हजारांचं मिळेल त्यापैकी 21000 पगार थेट हातात मिळेल. तर, 9000 रुपयांचा निधी अग्नीवीर कॉर्पस  फंडमध्ये जमा केला जाईल. याशिवाय सरकार देखील 9000 जमा करेल. दुसऱ्य वर्षी हातात मिळणारी रक्कम 23100 तर अग्नीवीर फंडमध्ये 9900, तिसऱ्या वर्षी 25550  रुपये हातात मिळतील. तर, फंडमध्ये 10950 जमा होतील. चौथ्या वर्षी पगार 28000 हातात मिळेल. तर, 12000 रुपये अग्नीवीर फंडमध्ये जमा होतील. चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर अग्नीवीर उमेदवाराला त्याच्या योगदानाचे 5 लाख 2 हजार आणि भारत सरकारच्या योगदानाचे 5.2 लाख असे एकूण 10 लाख 4 हजार रुपये मिळतील. 

दरम्यान, अग्नीवीर म्हणून काम सुरु केल्यास 48 लाख रुपयांचं विमा संरक्षण त्यांना दिलं जाईल. अग्नीवीर म्हणून काम करण्याचा कालावधी चार वर्षे आहे. त्यानंतर त्यापैकी 25 टक्के अग्नीवीर भारतीय सैन्यदलात नियमित केडरमध्ये दाखल होतील. 

इतर बातम्या : 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget