एक्स्प्लोर

धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे,शिवाजी रामदास जरे,सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे या 5 जणांना अटक केली आहे.

पुणे :  बंगळुरूमध्ये आपल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची बातमी, दुसरीकडे उपजिल्हाधिकारी पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याची बातमी ताजी असतानाचा दौंड तालुक्यातूनही खळबळजनक बातमी समोर आली आहे. होणार नवरा पसंत नसल्याने त्याला भावी पत्नीनेच थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील तरुणासोबत होणार होता. मात्र, मयुरीला त्याच्यासोबत लग्न (Marriage) करायचं नसल्याने त्याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या (Police) तपासात समोर आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे,शिवाजी रामदास जरे,सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे या 5 जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भावी नवरदेवाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा हा युवक हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटानजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात काही जणांनी नवरदेवाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये, त्याला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 109,352,351 यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे रा.गुघलवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये, आरोपी आदित्यने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतल असून आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली असून लग्न जमलेल्या दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा

संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
Embed widget