एक्स्प्लोर
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
Nashik Rain Update : गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कमालीची वाढ झाली आहे.

Godavari Flood 2024
1/7

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण 93.4 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
2/7

गंगापूर धरणातून सकाळपासून टप्याटप्याने विसर्गात वाढ केली जात आहे.
3/7

गंगापूर धरणातून सकाळी 8 वाजता 520 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला. तर दुपारी एक वाजेपासून 2 हजार 382 क्यूसेक, दुपारी 4 वाजता 3 हजार 900 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
4/7

यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसला आहे.
5/7

अनेक छोटी मंदिर पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी गेले आहे.
6/7

पाण्याची पातळी वाढत असली तरी जीव धोक्यात घालून लहान मुलांना घेऊन पर्यटक फोटो सेशनची हौस भागवत असल्याचे दिसून आले आहे.
7/7

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Published at : 24 Aug 2024 04:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
क्राईम
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
