एक्स्प्लोर
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर कडक इस्त्रीच्या कपड्यात पोलिसांच्या गाडीतून खाली उतरला अन्...
Prashant Koratkar: जुना राजवाडा पोलीस स्टेशनला प्रशांत कोरटकरला आणण्यात आलं आहे.
Prashant Koratkar
1/8

Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला घेऊन आज (25 मार्च) सकाळी 8 वाजता पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
2/8

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरबद्दल शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे आज सकाळी राजवाडा पोलीस स्टेशनला आणतान देखील आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.
3/8

प्रशांत कोरटकरची थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणी होईल. त्यानंतर आजच प्रशांत कोरटकरला कोर्टासमोर हजर करण्यात येईल.
4/8

प्रशांत कोरटकरला काल तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज कोल्हापुरात त्याला आणण्यात आले.
5/8

इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता.
6/8

24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटांनी कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती. इंद्रजित सावंतांचा नंबर त्यानं कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे.
7/8

25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरटकरनं 27 फेब्रुवारीला एक व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. 28 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं त्याला अटकपूर्व जमीन मंजूर केला.
8/8

कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच त्याचा जामीन मंजूर झाला. कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला.
Published at : 25 Mar 2025 08:13 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















