Chhaava Box Office Collection Day 39: 'छावा'ची मोठी मजल; मिळवला सर्वाधिक कमाई करणाऱ्या दुसऱ्या बॉलिवूड फिल्मचा बहुमान, 'या' फिल्मचा रेकॉर्ड चक्काचूर
Chhaava Box Office Collection Day 39: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं आज बॉक्स ऑफिसवर असा चमत्कार केला आहे, ज्याचा विचार करणंही अशक्य वाटत होतं.

Chhaava Box Office Collection Day 39: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) रिलीज होऊन महिन्याहून अधिक काळ लोटला, तरीसुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) बक्कळ नोटा छापत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'छावा' (Chhaava) जितक्या वेगानं कमाई करतोय त्यावरुन स्पष्ट होतंय की, त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही. आतापर्यंत 'छावा'नं भल्याभल्या दिग्गजांना धूळ चारली आहे. अनेक हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड चक्काचूर करणारा 'छावा'नं सहाव्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवला. एवढंच काय तर, त्यानंतर सातव्या आठवड्यातही 'छावा'नं मोठी मजल मारत चांगली कमाई केली आहे. यावरुन 'छावा'ची बॉक्स ऑफिसवरची घौडदौड थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीत, हे मात्र खरं.
'छावा' प्रदर्शित झाल्यानंतरचा सोमवारचा 39 वा दिवस होता आणि या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला. 'छावा'नं किंग खानचा 'जवान'ला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं. चित्रपटाच्या 39 व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीच्या आकड्यांबाबत बोलायचं झालं तर, 'छावा' आजही सर्वांना पुरून उरला.
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
अधिकृत आकडेवारीनुसार, 'छावा'नं पाच आठवड्यांत म्हणजेच, 35 दिवसांत हिंदीतून 571.40 कोटी रुपये आणि दोन आठवड्यात तेलुगूमधून 14.41 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण 585.81 कोटी रुपये कमावले. त्यानंतर, 36 व्या, 37 व्या आणि 38 व्या दिवशी, चित्रपटानं दोन्ही भाषांमध्ये अनुक्रमे 2.1 कोटी, 3.65 कोटी आणि 4.65 कोटी रुपये कमावले. म्हणजेच 38 दिवसांत एकूण 596.21 कोटी रुपये कलेक्शन झाले.
View this post on Instagram
सॅक्निल्कवर उपलब्ध असलेल्या आजच्या 10.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, फिल्मनं काल 1.75 कोटींची कमाई केली असून चित्रपटाची एकूण कमाई 597.96 कोटी रुपये झाली आहे. हे आकडे अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतात. फायनल डेटा आल्यानंतर कदाचित कमाईमध्ये काहीशी वाढ दिसू शकते.
'छावा' सर्वाधिक कमाई करणारी दुसरी बॉलिवूडची फिल्म
'छावा'नं सोमवारी कमाल केली. अनेक फिल्म्सनी कित्येक महिने थिएटरमध्ये राहिल्यानंतरही जे केलं नाही, ते 'छावा'नं करून दाखवलं. फिल्म आज हाईएस्ट ग्रॉसिंग बॉलिवूडच्या टॉप 3 फिल्म्सच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
'छावा'नं काल श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2' च्या 597.99 कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकलं. आता या चित्रपटाच्या पुढे फक्त एकच बॉलिवूड चित्रपट आहे आणि तो म्हणजे, 2023 मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा जवान, ज्यानं त्यावेळी 640.25 कोटी रुपये कमावले होते.
'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. या चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. पुष्पा 2, अॅनिमल आणि सलमान खानचा आगामी चित्रपट सिकंदरमध्ये मुख्य भूमिका साकारणारी रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात आहे. आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांच्याव्यतिरिक्त अक्षय खन्नानंही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
