एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : भाजप-शिवसेना युती कशी तुटली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची इनसाईड स्टोरी 

Devendra Fadnavis On BJP-Shiv Sena Alliance : 2014 ला भाजप-शिवसेना युती नेमकी कशी तुटली? त्यासाठी काय खलबतं घडले? याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वत: दिली आहे.   

Devendra Fadnavis On BJP-Shiv Sena Alliance : भाजप-शिवसेनेची युती का तुटली यावरून राज्याच्या राजकारणात सतत वेगवेगळे दावे केले जातात. विशेष म्हणजे यावर दिल्लीचे नेते देखील आपले मत मांडताना पाहायला मिळाले आहे. अशातच या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करत या घटनेची पुन्हा एकदा आठवण दिली आहे. 2014 ला भाजप-शिवसेना युती नेमकी कशी तुटली? त्यासाठी काय खलबतं घडले? याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वत: दिली आहे.   

या विषयी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 साली शिवसेनेला तेव्हा 147 जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं. पण विधाताच्या मनात काही वेगळंच होतं, मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं. शिवसेना 151 वर ठाम राहिले आणि युती तुटली, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  

पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता, मात्र... 

शिवसेना 147 आणि भाजप 127 असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता, मात्र उद्धव ठाकरे 151 वर अडून बसले. आमचे मित्र शिवसेनेचे अध्यक्ष यांच्यासोबत आमचा तेव्हा बोलणं चालू होतं. आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो. मात्र त्यांनी आपल्या मनात 151 चा आकडा पकडला होता. तेव्हा ओमप्रकाश माथूर हे महाराष्ट्र प्रभारी होते यांनी अमित शहा यांच्या सोबत बोलणं केलं आणि सांगितलं की अशाप्रकारे चालणार नाही, अमित शहा यांनी पंतप्रधान यांच्या सोबत बोलणं केलं आणि तेव्हा ठरलं की आम्ही 127 आणि ते 147 असा फॉर्म्युला ठरला तर होईल, नाहीतर युती राहणार नाही. तेव्हा मी अमित शहा आणि ओमप्रकाश मधुर आम्ही आत्मविश्वास होता की आम्ही लढू शकतो, बाकी पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता. या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टीमेटम दिलं आणि सांगितलं की 147 वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत  आणि आम्ही 127 लढू. दोघांचेही चांगला निकाल लागेल दोघांचेही मिळून 200 च्या वर निवडून येतील तुमचा मुख्यमंत्री बनेल आणि आमचा उपमुख्यमंत्री बनेल. पण विधात्याच्या मनात काही वेगळंच होतं, मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं.

ते कौरवांच्या मूडमध्ये आले अन् पाच गाव सुद्धा देणार नसल्याची भूमिका घेतली- मुख्यमंत्री 

पण नाही युवराज यांनी घोषणा केली की 151 आणि त्यामध्ये एकही सीट कमी होणार नाही. ते कौरवांच्या मूडमध्ये आले पाच गाव सुद्धा देणार नाहीत. पाचगाव नाही देणार तर श्रीकृष्ण आमच्या सोबत आहेत. लढाई झाली, मी तेव्हा प्रचारात होतो पण पाठीशी ओम प्रकाश माथुर आणि अमित शहा होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रेडिबिलिटीमुळे इतक्या कमी वेळात पहिल्यांदाच आम्ही 260 सीट लढलो. त्याआधी आम्ही ११७ पेक्षा जास्त जागा लढलोच नाही. 

260 जागा लढलो आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा राहिलो आणि तेव्हापासून आजपर्यंत शंभर पार करणारी महाराष्ट्रातील मागील 30 वर्षातील ही एकमेव पार्टी आहे. आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शहा आणि ओम प्रकाश मातुर यांना जातं असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् 2069 सदस्यसंख्या
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् 2069 सदस्यसंख्या
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् 2069 सदस्यसंख्या
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् 2069 सदस्यसंख्या
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Embed widget