एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nashik Waghera Fort : वाघेरा किल्ल्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा, वीरगळी, तेल-चुन्याच्या घाण्यांना उर्जितावस्था
Nashik Waghera Fort : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ऐतिहासिक वाघेरा किल्ल्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा आढळून येतात.
![Nashik Waghera Fort : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ऐतिहासिक वाघेरा किल्ल्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा आढळून येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/10c891e500e4a178e6f31c329b22ea6f1674385518220441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Waghera Fort
1/10
![नाशिकच्या सह्याद्रीच्या नऊ शिखरांच्या डोंगररांगेत अनेक ऐतिहासिक घटना, घडामोडींची ओळख देणाऱ्या अनेक जुन्या वास्तू आढळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/1ea818ecb611b23fc551bf7e41a3dc5e7522c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या सह्याद्रीच्या नऊ शिखरांच्या डोंगररांगेत अनेक ऐतिहासिक घटना, घडामोडींची ओळख देणाऱ्या अनेक जुन्या वास्तू आढळतात.
2/10
![नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/32fff645ffddf5ef8c46f704d1ec63dfecc3e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या "ऐतिहाशिक पाउलखुणांचा शोध"या शिवारफेरी काढण्यात आली.
3/10
![त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक विरगळी, जुन्या मूर्ती, कोरीव दगड, दगडी तुळशी वृंदावन, समाधी, चुन्याच्या घण्याचे जुने दगडी चाक अशा कित्येक ऐतिहासिक पाऊलखुणा सापडल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/32fff645ffddf5ef8c46f704d1ec63df31085.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक विरगळी, जुन्या मूर्ती, कोरीव दगड, दगडी तुळशी वृंदावन, समाधी, चुन्याच्या घण्याचे जुने दगडी चाक अशा कित्येक ऐतिहासिक पाऊलखुणा सापडल्या आहेत.
4/10
![अनेक ऐतिहासिक घटनांची ओळख देणाऱ्या अनेक पाउलखुणांचा शोध घेतला जाणार आहे. यानिमित्ताने इतिहासाच्या घटनांचा अभ्यास करता येईल. या माध्यमातून काही संदर्भ हाती लागतील असे दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/a74810413a4ad388699a52b4d241769e3899f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक ऐतिहासिक घटनांची ओळख देणाऱ्या अनेक पाउलखुणांचा शोध घेतला जाणार आहे. यानिमित्ताने इतिहासाच्या घटनांचा अभ्यास करता येईल. या माध्यमातून काही संदर्भ हाती लागतील असे दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.
5/10
![इतिहास अनेक अंगाने मांडला जातो, कोणी पोवाडे गाऊन तर कोणी कवने, गीते व कथा सांगून, जुन्या जाणकार माणसांच्या तोंडून हा इतिहास ऐकायला मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/7fc6618fc92519ff7b0d54ae3bf340058f3f4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतिहास अनेक अंगाने मांडला जातो, कोणी पोवाडे गाऊन तर कोणी कवने, गीते व कथा सांगून, जुन्या जाणकार माणसांच्या तोंडून हा इतिहास ऐकायला मिळतो.
6/10
![अनेक गावागावात इतिहास दडलेला आहे. मात्र शोधण्याची दृष्टी असली की इतिहासाचे दाखले,संदर्भ हाती लागतात. त्यासाठी तुमच्याकडे त्या त्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याची उर्मी लागते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/01ec6b18338f195f7cd4f999bdd550abaa3d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक गावागावात इतिहास दडलेला आहे. मात्र शोधण्याची दृष्टी असली की इतिहासाचे दाखले,संदर्भ हाती लागतात. त्यासाठी तुमच्याकडे त्या त्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याची उर्मी लागते.
7/10
![शिवकार्य गडकोट संवर्धनसंस्थेच्या माध्यमातून अनेक गडकिल्ल्याना नवसंजीवनी देण्याचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर वाघेरा किल्ल्यावर मोहीम राबविण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/dfb1f234acd73c94044a1ddff808184668cfa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवकार्य गडकोट संवर्धनसंस्थेच्या माध्यमातून अनेक गडकिल्ल्याना नवसंजीवनी देण्याचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर वाघेरा किल्ल्यावर मोहीम राबविण्यात आली.
8/10
![अनुभव व जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन हा इतिहासाचा शोध तो ही दगडात कोरलेल्या ऐतिहासिक पाउलखुणांतून घेतला जात आहे. याकामी इतिहास संशोधन व संशोधक यांची ही मदत मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/5069005b79578942b6aa111260aa9f5ebb96d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुभव व जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन हा इतिहासाचा शोध तो ही दगडात कोरलेल्या ऐतिहासिक पाउलखुणांतून घेतला जात आहे. याकामी इतिहास संशोधन व संशोधक यांची ही मदत मिळते.
9/10
![नाशिकच्या गडकिल्ले व त्यांच्या आजूबाजूंच्या गावाला अनेक इतिहासाचे दाखले तेथील दगडातून मिळतात. त्या दृष्टीने नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील वाघेरा किल्ला परिसरातील गाव त्यात दडलेल्या काही दगडी पाऊलखुणा खूपच विविधता दाखवणाऱ्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/5001d231d3117fa6b4b5c450c632b95048ee8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या गडकिल्ले व त्यांच्या आजूबाजूंच्या गावाला अनेक इतिहासाचे दाखले तेथील दगडातून मिळतात. त्या दृष्टीने नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील वाघेरा किल्ला परिसरातील गाव त्यात दडलेल्या काही दगडी पाऊलखुणा खूपच विविधता दाखवणाऱ्या आहेत.
10/10
![वाघेरा किल्ल्यावरही अनेक ऐतिहासिक संदर्भ दर्शवणा-या पाऊलखुणा आढळल्या आहेत. त्या संदर्भात इतिहास संशोधन मंडळातील मंडळींकडून अभ्यासात्मक नोंदी तयार केल्या जाणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/30c2557543b415d89112cbf08c7097e9bfd07.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाघेरा किल्ल्यावरही अनेक ऐतिहासिक संदर्भ दर्शवणा-या पाऊलखुणा आढळल्या आहेत. त्या संदर्भात इतिहास संशोधन मंडळातील मंडळींकडून अभ्यासात्मक नोंदी तयार केल्या जाणार आहेत.
Published at : 22 Jan 2023 04:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion