एक्स्प्लोर
Nashik Graduate Constituency: अशी होतेय नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी, पाहा फोटो एका क्लिकवर
Nashik Election : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

Nashik election
1/10

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.32 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंपरी येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे.
2/10

राज्यातील पाच शिक्षक पदवीधर मतदारसंघात आज मतमोजणी होत आहे. मात्र या सर्वात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.
3/10

यातील 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. त्यानंतर आज सर्व मतपेट्या उघडण्यात आल्या असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
4/10

जवळपास 28 टेबलवर मतमोजणी चालणार असून, पहिल्या पसंतीचा कल पुढे येण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उमेद्वारासंह कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे.
5/10

दरम्यान, सकाळी आठ वाजल्यापासून 28 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली असून एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होईल. या एका टेबलवर तीन अधिकारी उपस्थित राहतील. यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश असेल.
6/10

सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते एकमेकांत मिसळले जातील, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. यातून वैध मते काढून मतमोजणाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला सुमारे चार तास लागतील.
7/10

नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणीच्या ठिकाणी मोबाइल नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सुरुवातीला मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा काढण्यात येईल. वैध मताला दोनने भागून त्यात एक आकडा मिळविला की कोटा प्राप्त होतो.
8/10

ज्या उमेदवाराने पहिल्या पसंतीची मते मिळवून कोटा पूर्ण केला त्याला विजयी घोषित करण्यात येईल. कोटा पूर्णच झाला नसेल तर पहिल्या पसंतीची मते ज्याला सर्वात कमी मिळाली त्या उमेदवाराला बाद ठरवून त्याच्या मतपत्रिकेत मतदाराने दुसरा पसंतीक्रम कुणाला दिला त्यानुसार मतमोजणी केली जाते.
9/10

मतपत्रिकेत पसंतीक्रम शब्दांत नोंदविणे, एकाच उमेदवारांच्या समोर 1, 2, 3 असा क्रम लिहिणे असे आढळल्यास ही मते अवैध ठरविण्यात येईल. केंद्रात असलेल्या जांभळ्या शाईच्या पेनाऐवजी इतर पेन वापरला तरीही मत अवैध ठरते.
10/10

त्यामुळे मतदान केंद्राबाहेरच मतदारांचे स्वत:चे पेन जमा करण्यात आले होते. मतदारांना जांभळ्या रंगाचा विशिष्ट पेन निवडणूक आयोगाकडूनच देण्यात आला. प्रथम पसंती दर्शविला नसल्यास मत अवैध ठरते. कोणाची मते अवैध ठरली, हे मतमोजणी करताना निदर्शनास येईल. (सर्व फोटो : किरण कटारे, एबीपी माझा प्रतिनिधी)
Published at : 02 Feb 2023 12:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
