एक्स्प्लोर
PHOTO : जयंत पाटील यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा संपन्न, बड्या राजकीय नेत्यांची उपस्थिती
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांचा विवाह सोहळा आज थाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला सर्व पक्षीय राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती.

NCP President Jayant Patil son Prateek Patil wedding ceremony photo
1/9

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांचा विवाह सोहळा आज थाटात पार पडला.
2/9

या विवाह सोहळ्याला सर्व पक्षीय राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती.
3/9

या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहु महाराज, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
4/9

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसह अनेक बडे नेते उपस्थित राहिले.
5/9

या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकत्र आले.
6/9

इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस शाही लग्नसोहळा पार पडला.
7/9

प्रतीक पाटील यांनी 2014 पासून वाळवा इस्लामपूर मतदार संघात राजकीय कारकीर्द सुरू केली आहे.
8/9

प्रतीक यांनी लंडन येथे इजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे.
9/9

सांगलीतील किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्सचे सर्वेसर्वा उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची सुकन्या अलिका यांनीही बिझनेस क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलं आहे. त्या सध्या किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहेत.
Published at : 27 Nov 2022 10:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
