एक्स्प्लोर
Photo : छ. संभाजीनगरचे पालकमंत्री भुमरे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी केली आहे.

Sandipan Bhumre
1/8

अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
2/8

यात कांद्याच्या पिकाचे देखील अवकाळी पावसाने मोठं नुकसान केले असून, पीक अक्षरशः आडवे झाले आहेत.
3/8

दरम्यान पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी मंगळवारी कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
4/8

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी भुमरे यांनी प्रत्यक्ष जाऊन केली असून, शेतकऱ्यांशी संवाद साधला.
5/8

तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशा सूचना देखील भुमरे यांनी केल्या.
6/8

यावेळी भुमरे यांनी नुकसान झालेल्या कांद्याच्या पिकाची पाहणी केली, तसेच झालेल्या नुकसानीबाबत जाणून घेतले.
7/8

यावेळी भुमरे यांच्यासह भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे देखील उपस्थित होते.
8/8

तर यावेळी भुमरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील दिले.
Published at : 12 Apr 2023 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
