एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबाद पोलीस भरतीची मैदानी चाचणी 2 जानेवारीपासून
Maharashtra Police Bharti: शिंदे-फडणवीस सरकराने राज्यात साडेसात हजार पोलीस भरतीची घोषणा केली होती.

Aurangabad Police Bharti
1/9

त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यात भरतीची प्रकिया सुरु झाली आहे.
2/9

दरम्यान औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलासाठी एकुण 39 पदे भरली जाणार आहे.
3/9

यासाठी उमेदवारांची मैदानी चाचणी व शैक्षणिक पात्रता तपासणी प्रक्रियेला 2 जानेवारी 2023 पासुन सुरूवात होणार आहे.
4/9

औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिय यांनी आज पोलीस भरती प्रक्रियेबाबत नियोजनाचा आढावा घेतला.
5/9

यावेळी त्यांनी सुलभ व पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया राबविण्याचे दृष्टीकोनातुन अधिकारी व अंमलदार, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना सुचना व मार्गदर्शन केले आहे.
6/9

प्रत्येक मैदानी चाचणी करिता उमेदवारांनी प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या दिनांका प्रमाणे वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन देखील कलवानिय यांनी केले आहेत.
7/9

शारिरीक व मैदानी चाचण्याची संपुर्ण पणे व्हिडीओग्राफी केली जाणार आहे.
8/9

त्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईकांनी कोणत्याही एजंट, दलाल, अधिकारी, कर्मचारी, यांच्या भुलथापाना किंवा आमिषाला बळी पडु नये.
9/9

या संपुर्ण प्रक्रियेमध्ये कोणाचाही वशीला,ओळख याचा उपयोग होणार नाही, असेही पोलीस अधीक्षक म्हणाले.
Published at : 30 Dec 2022 08:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion