एक्स्प्लोर
Photo: छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात 14 नवी वाहनं, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar: पोलीस दलाच्या ताफ्यात आता आणखी नवीन वाहनांचा समावेश.

Photo: छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात 14 नवीन वाहने, पाहा फोटो
1/8

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या पायाभूत सुविधा मजबुत करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमांतून निधी देण्यात आला आहे.
2/8

दरम्यान, 2 कोटी 20 लाख 32 हजार रूपयांचा निधी जिल्हा पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आला आहे.
3/8

या निधीच्या माध्यमांतुन जिल्हा पोलीस दलाचे वाहन ताफ्यात नव्याने वाहने दाखल झाले आहेत.
4/8

ज्यात 7 फोर्स मोटर्स ट्रॅक्स, आणि 7 महिंद्रा बोलेरो निओ असे 14 चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले आहे.
5/8

तर या सर्व वाहनांचे ताफ्यास शनिवारी (04 मार्च) रोजी पोलीस मुख्यालय येथील पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते सर्व वाहनांना हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले आहे.
6/8

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाची हद्द मोठी असल्याने त्यांना या वाहनांचा फायदा होणार आहे.
7/8

सकंट समयी नागरिकांना मदतीसाठी पोलीसांची गाडी लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
8/8

तर पुढेही पोलीस दलास मागणीप्रमाणे वाहने उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन भुमरे यांनी दिले आहे.
Published at : 05 Mar 2023 01:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion