एक्स्प्लोर
Advertisement

39 वर्षांची झाली ही अभिनेत्री, 1 मुलाची आई झाली तरीही मिळतायत 'स्कूलगर्ल'च्या भूमिका!
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदरी आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावरून वयाचा अंदाज लावता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे.

/sonamkapoor/
1/10

या अभिनेत्रीची खास गोष्ट म्हणजे ती 39 वर्षांची आहे, पण तरीही तिला 18-19 वर्षांच्याच भूमिका मिळत आहेत, कारण तिचा चेहरा पाहूनही तिचं वय कोणालाच कळू शकत नाही.
2/10

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सौंदर्य आणि वयाच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करतात.
3/10

त्यांच्याकडे पाहून त्यांचे वय काय असेल याचा अंदाज बांधणे कठीण होते. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाने मोठे असूनही आपल्या करिअरमध्ये तरुण भूमिका केल्या आहेत.
4/10

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीची ओळख करून देणार आहोत. जी एका मुलाची आई आहे आणि 39 वर्षांची आहे, पण तरीही तिला लहान वयाच्या भूमिका ऑफर केल्या जात आहेत.
5/10

बॉलिवूडची फॅशन दिवा सोनम कपूरबद्दल बोलत आहोत, जिला सुरुवातीपासूनच तिच्या वयानुसार अभिनय करायला आवडते. अलीकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्रीने खुलासा केला की आजही तिला शालेय मुलींच्या भूमिकांची ऑफर दिली जाते, परंतु अभिनेत्री त्या भूमिका निभावत नाही. तिने तिच्या मुलाखतीत सांगितले की, ती 39 वर्षांची असली तरी 20 वर्षांच्या मुलीने साकारायला हव्यात अशा भूमिका तिला मिळत आहेत.
6/10

सोनम पुढे म्हणाली, 'म्हणजे, आता मी जान्हवी किंवा खुशीइतकी तरुण दिसत नाही, पण मी आभारी आहे की लोक मला अजूनही तरुण मानतात.
7/10

सोनम कपूर शेवटची जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या 'ब्लाइंड' चित्रपटात दिसली होती.
8/10

2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता.
9/10

सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
10/10

सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.(pc:/sonamkapoor/ig)
Published at : 25 Jul 2024 12:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
