अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
Possible list of Guardian Ministers : धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून बाजूला करण्यात यावे, अशी मागणी होत असताना त्यांना पालकमंत्रीपद मिळणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Possible list of Guardian Ministers : महायुती सरकारमध्ये अजूनही काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याने चर्चा सुरू झाल्या असतानाच आता संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दोन दोन पक्षांनी दावा केल्याने सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, संभाव्य जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण असतील याची यादी समोर आली आहे. संभाव्य यादीनुसार छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, नाशिक, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद असल्याचे दिसून येत आहे, तर मुंबई शहर, साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे त्यामुळे वादातील जिल्ह्यांची जबाबदारी या जिल्ह्यांमध्ये कोणाकडे मिळणार याची उत्सुकता आहे.
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून बाजूला करण्यात यावे, अशी मागणी होत असताना त्यांना पालकमंत्रीपद मिळणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, संभाव्य यादीमध्ये धनंजय मुंडे यांचे नाव बीड जिल्ह्यासाठी नसलं तरी नजीकच्या धाराशिव जिल्हा हा त्यांच्या ताब्यात दिला जाईल अशी संभाव्य यादी मधून माहितीसमोर येत आहे. पुणे जिल्ह्याचे आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याकडेच ठेवतील अशी चिन्हे आहेत.
गडचिरोली पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार
पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडेच राहील अशी चिन्ह आहेत. सर्वाधिक वादग्रस्त आणि संवेदनशील झालेल्या बीड जिल्ह्याचे पालकत्व अजित पवार स्वतःच तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा आहे. दरम्यान गडचिरोली पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. या ठिकाणचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीच घ्यावं, अशी सुद्धा मागणी केली जात आहे. मात्र, गडचिरोली पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार असलं, तरी ते अजून नाव मात्र संभाव्य यादीत निश्चित झालेलं नाही. मात्र ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस हेच घेतील अशी चर्चा आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये मुंबई शहरची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे जाण्याची शक्यता असून मुंबई उपनगरची मंगलप्रभात लोढा यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या