एक्स्प्लोर

Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!

Las Vegas Tesla Truck Blast Case : मॅथ्यू 19 वर्षांपासून अमेरिकन सैन्यात कार्यरत होता. स्फोटापूर्वी त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली होती. ट्रकमध्ये फटाक्यांच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.

Las Vegas Tesla Truck Blast Case : एफबीआयने 1 जानेवारीला अमेरिकेतील लास वेगास येथील ट्रम्प हॉटेलबाहेर झालेल्या ट्रक स्फोट प्रकरणाचे वर्णन आत्महत्येची घटना असे केले आहे. या स्फोटात 7 जण जखमी झाले आहेत. एफबीआयने टेस्ला ट्रकमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख मॅथ्यू लीव्हल्सबर्गर, 37, कोलोरॅडो येथील अमेरिकन सैनिक आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी मॅथ्यूचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते, त्यानंतर त्याने तिच्याशी संबंध तोडले. मॅथ्यूला एक मुलगीही आहे. लिव्हल्सबर्गरच्या पत्नीला त्याच्या अफेअरची माहिती मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी, लिव्हल्सबर्गरचे त्याच्या पत्नीशी याच मुद्द्यावरून भांडण झाले. यानंतर तो कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील आपल्या घरी रवाना झाला.

स्फोटापूर्वी स्वत:वर गोळी झाडली

मॅथ्यू 19 वर्षांपासून अमेरिकन सैन्यात कार्यरत होता. स्फोटापूर्वी त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली होती. ट्रकमध्ये फटाक्यांच्या वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. एफबीआयने असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे लिव्हल्सबर्गरला कोणत्याही दहशतवादी संघटनेशी जोडलेली कोणतीही माहिती नाही. एफबीआयने सांगितले की, या घटनेशी संबंधित मॅथ्यू लिव्हल्सबर्गर हा लष्करातून काही दिवसांच्या रजेवर आला होता. लास वेगासला येण्यापूर्वी त्याने 28 डिसेंबर रोजी टेस्ला ट्रक भाड्याने घेतला. एफबीआयने सांगितले की, सायबर ट्रकमध्ये सापडलेला मृतदेह एवढा जळालेला होता की त्याची ओळख पटवणे कठीण होते. ओळखपत्र, पासपोर्ट आणि क्रेडिट कार्ड माहितीच्या आधारे नंतर मृतदेहाची ओळख मॅथ्यू लीव्हल्सबर्गर म्हणून करण्यात आली. त्यांच्या डोक्यात गोळीचा घाव होता आणि पायाजवळ बंदूक पडली होती.

न्यू ऑर्लीन्स ट्रक हल्ला टेस्ला सायबरट्रक अपघाताशी संबंध नाही

नवीन वर्षाच्या दिवशी न्यू ऑर्लीन्स ट्रक हल्ला आणि त्याच दिवशी नंतर लास वेगासमध्ये सायबरट्रक स्फोट यांच्यात अद्याप कोणताही संबंध सापडला नाही, असे एफबीआयने म्हटले आहे. न्यू ऑर्लीन्स दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 30 जण जखमी झाले. अमेरिकेत नुकत्याच घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये आरोपी अमेरिकन लष्करातील सैनिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तान, फोर्ट ब्रॅग, नॉर्थ कॅरोलिना येथे काम केले. त्याचबरोबर या दोघांनी एका टीममध्ये काम केले की नाही याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तसेच, दोन्ही आरोपींमधील मैत्रीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मॅथ्यूचा अमेरिकन लष्कराने सन्मानही केला होता

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत लिव्हल्सबर्गर हे यूएम आर्मीच्या ग्रीन बेरेट्सचे सदस्य होता आणि त्याने जर्मनीमध्ये 10 व्या स्पेशल फोर्सेस ग्रुपमध्ये काम केले होते. मॅथ्यूचा अमेरिकन लष्कराने सन्मानही केला होता. त्याला यापूर्वी पाच ब्राँझ स्टार मिळाले होते. याशिवाय त्यांना शौर्य पुरस्कार, लष्करी तुकडी आणि प्रशंसा पदकही मिळाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; परभणीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चाNCP Meeting : पालकमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकMajha gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 04 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines |  7 AM |  एबीपी माझा हेडलाईन्स | 04 Jan 2025 | Marathi News 24*7

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Embed widget