एक्स्प्लोर
PHOTO : आजी अभिनेत्री, तर आईही अभिनयक्षेत्रात सक्रिय, काजोलला घरातूनच मिळालंय अभिनयाचं बाळकडू!
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल आज (5 ऑगस्ट) तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे.

Kajol
1/6

90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल (Kajol) आज (5 ऑगस्ट) तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. 1974मध्ये जन्मलेली काजोल ही एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने या इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
2/6

मुळातच चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या काजोलला देखील बालपणापासून अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
3/6

काजोलची आई तनुजा एक अभिनेत्री आहेत. तिचे वडील शोमू मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते. काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी देखील अभिनेत्री आहे.
4/6

काजोलची मावशी नूतन देखील एक अभिनेत्री होती. तिची आजी शोभा समर्थ आणि पणजी रतन बाई या दोघीही चित्रपटसृष्टीशी संबंधित होत्या.
5/6

काजोलचे काका जॉय मुखर्जी आणि देब मुखर्जी दोघेही चित्रपट निर्माते होते, तर आजोबा सशधर मुखर्जी हे चित्रपट निर्माते होते. काजोलची भावंडं अर्थात राणी मुखर्जी, शरबानी मुखर्जी आणि मोहनीश बहल हे देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
6/6

1992मध्ये तिने 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत शूटिंग करेन आणि नंतर शाळेत पुन्हा परतेन, असा निर्धार करून तिने चित्रपट स्वीकारला. मात्र, या चित्रपटानंतर तिने शिक्षण सोडले आणि पूर्णवेळ करिअर करण्यावर लक्ष केंद्रित केले. (Photo : @Kajol/IG)
Published at : 05 Aug 2022 10:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
