एक्स्प्लोर
अब्दु रोजिकचे एंगेजमेंटचे फोटो आले समोर, पाहा वधू-वरची झलक!
अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आयुष्यात एका मुलीची एन्ट्री झाल्याचं सांगितलं.

abdu_rozik
1/10

'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस'च्या माध्यमातून दरवर्षी कोणी ना कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टार होतो.
2/10

'बिग बॉस 16'मध्ये (Bigg Boss 16) अब्दु रोझिक झळकला होता. बिग बॉसच्या माध्यमातून अब्दु भारतात चांगलाच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात अनेकदा त्याने प्रेम आणि एकटेपणाबद्दल भाष्य केलं आहे.
3/10

अब्दुची उंची 3 फुट असल्याने एकही मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यात तयार नव्हती. पण अब्दुच्या आयुष्यात आता एका मुलीची एन्ट्री झाली आहे. अब्दु लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
4/10

अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे.
5/10

अब्दु रोझिकने इंस्ट्रग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अब्दु एका मुलीला अंगठी घालताना दिसत आहे.
6/10

फोटो शेअर करत अब्दुने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"Allhamdulillah 24.04.2024". याचा अर्थ की अब्दुने अमीरासोबत 24 एप्रिल 2024 रोजी साखरपुडा केला आहे". अब्दु आणि अमीराचा साखरपुडा दुबईत पार पडला आहे.
7/10

दुबईतच त्यांचं लग्नदेखील होणार आहे. अब्दुने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या पारंपारिक ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अब्दुच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
8/10

अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आयुष्यात एका मुलीची एन्ट्री झाल्याचं सांगतलं.
9/10

या व्हिडीओमध्ये त्याने त्या मुलीचं आपल्यावर खूप प्रेम असल्याचं सांगितलं. मीडिया रिपोर्टनुसार, अब्दु रोझिक आणि अमीरा 7 जुलैला दुबईत निकाह करणार आहेत.
10/10

या व्हिडीओमध्ये त्याने त्या मुलीचं आपल्यावर खूप प्रेम असल्याचं सांगितलं. मीडिया रिपोर्टनुसार, अब्दु रोझिक आणि अमीरा 7 जुलैला दुबईत निकाह करणार आहेत.
Published at : 11 May 2024 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
