एक्स्प्लोर
Tulsi Vivah 2024 : सुखी वैवाहिक जीवनासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी करा 'हे' उपाय
Tulsi Vivah 2024 : कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुळशी एकादशी साजरी केली जाते.

Tulsi Vivah 2024
1/8

कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुळशी एकादशी साजरी केली जाते. यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशी आणि 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह केला जाणार आहे.
2/8

तुळशी विवाहाच्या दिवशी सुवासिनी महिला उपवास ठेवून तुळशीची पूजा करतात. तसेच, या दिवशी भगवान विष्णू याच्या शालीग्राम रुपाच्या स्वरुपात तुळशीचा विवाह केला जातो. त्यानंतर चार महिन्यांपासून जे शुभ कार्य थांबले आहेत ते पूर्ण केले जाते. तसेच, या काळात लग्नविवाहाचे देखील शुभ योग आहेत.
3/8

विवाहित महिलांसाठी हा काळ फार खास असतो. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढतं. तसेच, जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील तर त्या देखील हे उपाय केल्याने दूर होतात.
4/8

पती-पत्नीच्या नात्यात जर वाद असतील तर या दिवशी तुळशीला लाल रंगाची ओढणी नक्की चढवा आणि पूजा झाल्यानंतर ही ओढणी सुवासिन महिलेला दान करा. असे केल्याने वैवाहिक नात्यात गोडवा वाढतो.
5/8

तुळशी विवाहाच्या दिवशी काही पानांना पाण्यात टाकून ते पूर्ण घरभर शिंपडा. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. तसेच, नवरा बायकोतील वादही दूर होतात.
6/8

तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेच्या दरम्यान रोपाभोवती सात वेळा परिक्रमा करा. तसेच, तुळशीसमोर तुपाचा दिवा ठेवा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद राहील.
7/8

तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल साडी, शेंदूर, ओढणी यांसारख्या गोष्टी चढवाव्यात. यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होईल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 12 Nov 2024 01:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
