एक्स्प्लोर
Weekly Horoscope 03 To 09 February 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 03 To 09 February 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 03 To 09 February 2025
1/6

आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला मालमत्तेशी संबंधित वादामुळे कोर्टात जावं लागू शकतं. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात अडचणी येत राहतील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
2/6

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कठीण जाऊ शकतो. तुमचं नियोजित काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. वैयक्तिक जीवनात कोणतीही अडचण आल्यास ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या.वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात.
3/6

सिंह राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला सतर्क राहावं लागेल. व्यवसायात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी सट्टेबाजी, लॉटरी इत्यादीपासून दूर रहा. नोकरीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा.
4/6

वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक काम अत्यंत हुशारीने करावं लागेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करू शकता. वाहन चालवताना काळजी घ्या, तुम्हाला दुखापत होऊ शकते. कोणतंही महत्त्वाचं काम करताना वडील किंवा हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या.
5/6

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ परिणाम देणारा ठरेल. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मित्रांकडून सहकार्य मिळेल. फिरायला जाण्याचं नियोजन करता येईल. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील. तुमची इच्छित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती होऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.
6/6

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून पाठिंबा न मिळाल्याने तुम्ही नाराज होऊ शकता. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. करिअर किंवा व्यवसायात मोठे निर्णय घेताना घाई करू नका.
Published at : 03 Feb 2025 12:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सातारा
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
