एक्स्प्लोर
Samudrika Shastra : 'असे' पाय असलेल्या मुली असतात खूप भाग्यवान, सदैव राहते देवी लक्ष्मीची कृपा
Palmistry Women Foot Reading : समुद्रशास्त्रानुसार ज्या मुलींचे पाय लांब आणि गुलाबी असतात, त्या खूप भाग्यवान असतात. मुलींच्या पायांबद्दल समुद्रशास्त्रात काय सांगितले आहे ते जाणून घ्या.

Palmistry Women Foot Reading
1/10

घराच्या सुख-समृद्धीमध्ये सर्वात मोठा हातभार महिलांचा असतो, असे अनेकदा सांगितलं जातं.
2/10

महिलांना घरातील लक्ष्मी मानलं जातं. त्यांच्या चांगल्या आचरणामुळे आणि शिस्तीमुळे घरात सुख-समृद्धी नांदते असं म्हणतात.
3/10

समुद्र शास्त्रामध्ये स्त्रियांच्या पायाची रचना आणि त्यामध्ये असलेल्या काही विशेष खुणा सांगण्यात आल्या आहेत, ज्यावरून त्या स्त्रिया किती भाग्यशाली आहेत हे कळते. या खुणा आणि गुण कोणते आहेत ते जाणून घ्या.
4/10

समुद्र शास्त्रानुसार, ज्या महिलांच्या पायावर कमळ, शंख, चक्र किंवा स्वस्तिक चिन्ह असते, अशा महिला खूप भाग्यवान असतात.
5/10

तसेच रुंद, गोलाकार आणि लाल अंगठा असलेल्या महिला देखील खूप भाग्यशाली मानल्या जातात. अशा स्त्रिया ज्या घरी जातात, त्या घरात धन आणि संपत्तीचा पाऊस पडतो. अशा महिला मोठ्या प्रशासकीय पदावर असतात असंही मानलं जातं.
6/10

ज्या महिलांचे पाय खूप मऊ, गुलाबी आणि पूर्ण विकसित असतात, अशा महिला आपल्या पती आणि प्रियकरांना खूप आनंदी ठेवतात.
7/10

अशा स्त्रियांच्या पतीला सर्व प्रकारचे वैवाहिक सुख प्राप्त होते. त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता नसते.
8/10

ज्या महिलांच्या पायाचा तळवा टाच आणि बोटांच्या बाजूने वर आणि मध्यभागी खोलगट असतो, अशा महिला कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात.
9/10

लग्नानंतर अशा महिला ज्या घरात जातात, त्या घरातील लोकांचे आयुष्यच बदलून जाते. तेथे पैशाची कमतरता नसते आणि अशा कुटुंबातील लोक दुप्पट प्रगती करतात.
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 26 Jul 2023 04:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion