एक्स्प्लोर
Numerology : 'ब्युटी विथ ब्रेन' असतात 'या' जन्मतारखेच्या मुली, आयुष्यात प्रवेश करताच होते भरभराट
Numerology or Ank Jyotish : अंक ज्योतिष (Ank Jyotish) शास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकाबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांच्या आधारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे व्यक्तिमत्व जाणून घेता येते.

Numerology Girls Born On These Dates Are Very Intelligent
1/9

आपल्या मूलांकावरुन, आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये परिस्थिती कशी असेल याबद्दल बरीच माहिती मिळते. अंकशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही स्वतःबद्दलही बरेच काही जाणून घेऊ शकता.
2/9

अंक ज्योतिष शास्त्रामध्ये मूलांक 5 असलेल्या मुलींना खूप खास मानलं जातं. कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
3/9

अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह ज्ञान आणि बुद्धीचं प्रतिक आहे, त्यामुळे मूलांक 5 असलेले लोक खूप बुद्धिमान असतात.
4/9

अंकशास्त्रात, 5 क्रमांकाला खूप महत्त्व आहे. पूजेमध्ये 5 अंकांला महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच या मूलांकाचे लोकही खास मानले जातात.
5/9

बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हा मूलांक असलेल्या महिला खूप बुद्धिमान आणि निर्भय असतात. या मुली त्यांचं प्रत्येक काम अतिशय प्रामाणिकपणे करतात.
6/9

मूलांक 5 असलेल्या मुली खूप हुशार असतात. या मुली 'ब्युटी विथ ब्रेन' असतात. त्या कोणतंही काम खूप लवकर शिकतात आणि त्यामध्ये तरबेज होतात.
7/9

या मुली खूप भावनिकही असतात. त्यांना नवीन संबंध बनवण्यात खूप आनंद मिळतो. स्वभावाने अतिशय मनमिळावू असल्याने त्यांचे मित्रही मोठ्या प्रमाणात आहेत. प्रेमसंबंधही चांगले राहतात.
8/9

या मुली धैर्यवान आणि मेहनती असतात. मेहनत आणि बुद्धीच्या बळावर या सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण करतात.
9/9

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.
Published at : 01 Jan 2025 08:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
