एक्स्प्लोर

Israel Attacks Lebanon : इस्त्रायलकडून गाझापट्टीनंतर आता लेबनाॅनमध्ये युद्धाचा भडका; अखेर भारताने घेतला मोठा निर्णय

Israel attacks Lebanon : इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत मध्यपूर्वेत आणखी एका युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

Israel Attacks Lebanon : लेबनॉनमधील (Israel Attacks Lebanon) युद्धसदृश परिस्थितीबाबत भारत सरकारने एक नवीन सूचना जारी केली आहे. बेरूतमधील भारतीय दूतावासाने येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्वरित देश सोडण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर लोकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी दूतावासानेही लोकांना तेथे जाण्यास मनाई केली होती. लेबनॉन आणि इस्रायलमध्ये गेल्या 8 दिवसांत हल्ले वाढले आहेत. यामध्ये 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत मध्यपूर्वेत आणखी एका युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

इस्त्रायली फौजा हिजबुल्लाच्या हद्दीत घुसतील

सीएनएनच्या वृत्तानुसार, इस्रायलचे लष्करी प्रमुख हरजाई हलेवी यांनी बुधवारी सांगितले की, लेबनॉनमध्ये त्यांच्या हवाई हल्ल्यांचा उद्देश हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि जमिनीवर घुसखोरीचा मार्ग शोधणे हा आहे. इस्त्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी बुधवारी उशिरा हिजबुल्लाच्या 75 स्थानांवर हल्ला केला. बुधवारी इस्रायलच्या हल्ल्यात किमान 72 जणांचा मृत्यू झाला. इस्त्रायली फौजा हिजबुल्लाच्या हद्दीत घुसतील आणि त्यांच्या लष्करी चौक्या उद्ध्वस्त करतील, असे हलेवी यांनी सांगितले. तेव्हा त्यांना समजेल की इस्रायली सैन्याचा सामना करणे म्हणजे काय. हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे इस्रायली लोकांना आपली घरे सोडावी लागली, असे ते म्हणाले. आता त्यांना त्यांच्या घरी परतता येणार आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेत तातडीची बैठक बोलावण्यात आली

अमेरिका-फ्रान्सने 21 दिवसांच्या युद्धविरामाची मागणी बुधवारी केली होती. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धासंदर्भात न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होणार आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरेबिया, यूएई, कतारसह अनेक युरोपीय देशांनी युद्धबंदीच्या मागणीला पाठिंबा दिला. या बैठकीत फ्रान्सने लेबनॉनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवणे आवश्यक आहे, अन्यथा मध्यपूर्वेतील युद्ध आणखी वाढू शकते, असे सांगितले. इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविरामाच्या मागणीला हिजबुल्लाह, लेबनॉन आणि इस्रायलने प्रतिसाद दिला नाही. लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी हे आवश्यक आहे. युद्धबंदीसाठी त्यांनी इस्रायल आणि लेबनॉन सरकारचा पाठिंबा मागितला. मात्र, आतापर्यंत हिजबुल्लाह, लेबनॉन किंवा इस्रायलने युद्धविरामाला प्रतिसाद दिलेला नाही.

अमेरिकेवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव

गाझामध्ये जवळपास वर्षभरापासून लढाई सुरू आहे. मध्यपूर्वेतील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावर खूप दबाव आहे. आता त्यांना केवळ 116 दिवसच राष्ट्रपती पदावर असतील. बिडेन हे बऱ्याच काळापासून चर्चेद्वारे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु आतापर्यंत ते अयशस्वी ठरले आहेत. त्याचे प्रयत्न यशस्वी झाले तर त्याची प्रतिमा सुधारेल. याचा फायदा डेमोक्रॅटिक पक्षालाही निवडणुकीत होऊ शकतो. एकीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मध्यपूर्वेतील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे अमेरिका युद्धात मदत करण्यासाठी इस्रायलला घातक शस्त्रेही पुरवत आहे. या शस्त्रांच्या मदतीने गाझामध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget