एक्स्प्लोर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump, US Election Result 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्विवाद विजय मिळवलाय.

X Platform
1/11

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
2/11

डोनाल्ड ट्रम्प आता दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.
3/11

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. नेटकऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक मीम्स क्रिएट केले आहेत.
4/11

अमेरिकेतली 538 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाने 277 जागांवर विजय मिळवलाय.
5/11

अमेरिकेत बहुमत मिळवण्यासाठी 270 जागांची मॅजिक फिगर गाठण्याची गरज असते.
6/11

दरम्यान, कमला हॅरिस यांच्या डेमोक्रेटिक पक्षाने देखील 224 जागांवर विजय मिळवला आहे .
7/11

त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून कमला हॅरिस यांना पराभव पत्कारावा लागला आहे.
8/11

दरम्यान, डोनाल्ड ट्रप यांनी विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिएटिव्ह मीम्सचा पाऊस पडलाय.
9/11

अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची मैत्री दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
10/11

तर बऱ्याच जण्यांनी अमेरिकेला ग्रामीण राजकारणाशी जोडलं आहे.
11/11

त्यामुळे निवडणूक अमेरिकेची असली तरी भारतात मीम्सचा पाऊस पडतोय.
Published at : 06 Nov 2024 05:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion