(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anura Kumara Dissanayake : श्रीलंका डाव्या वळणावर; कामगाराच्या पोरानं घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ, तरुणाईच्या उद्रेकात राजकीय घराणेशाही हद्दपार
अनुरा यांनी 6 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिलेले विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा पराभव केला.श्रीलंकेत वर्षानुवर्षे सत्तेवर असलेल्या राजपक्षे कुटुंबाला सत्तेतून बेदखल करण्यात आले.
Anura Kumara Dissanayake : श्रीलंकेतील निवडणुकीत (Sri Lanka Presidential Elections) विजय मिळवल्यानंतर अनुरा दिसानायके यांनी आज (23 सप्टेंबर) राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. कोलंबोतील राष्ट्रपती सचिवालयात हा सोहळा पार पडला. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालांची पुष्टी होण्याची ही श्रीलंकेतील पहिलीच वेळ ठरली. कारण मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला 50 टक्के मते मिळाली नाहीत.
पहिल्या टप्प्यातील दोन आघाडीच्या उमेदवारांची, नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) च्या अनुरा कुमारा दिसानायके आणि समगी जना बालावेगया (SJB) चे साजिथ प्रेमदासा यांच्या मतांची दुसऱ्यांदा मोजणी झाली. 2022 च्या आर्थिक संकटामुळे बदलाची आशा असलेल्या तरुण मतदारांच्या मदतीने अनुरा राष्ट्रपती झाले आहेत.
This morning (23rd), I took oath as the 9th Executive President of the Democratic Socialist Republic of Sri Lanka in the presence of Chief Justice Jayantha Jayasuriya at the Presidential Secretariat.
— Anura Kumara Dissanayake (@anuradisanayake) September 23, 2024
I promise to fulfill your responsibility to usher in a new era of Renaissance… pic.twitter.com/TFJuyh9SbC
वर्षानुवर्षे सत्तेतील राजपक्षे कुटूंब सत्तेतून बेदखल
अनुरा यांनी 6 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान राहिलेले विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा पराभव केला. इतकेच नाही तर श्रीलंकेत वर्षानुवर्षे सत्तेवर असलेल्या राजपक्षे कुटुंबाला सत्तेतून बेदखल करण्यात आले. विजयानंतर पीएम मोदींनी सोशल मीडियावर अनुराला शुभेच्छा दिल्या. याशिवाय श्रीलंकेतील भारतीय राजदूतांनीही अनुरा यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
बंडखोरी ते सत्तेपर्यंत : अनुरा यांनी 5 वर्षांपूर्वी पक्ष पुन्हा सुरू केला
उत्तर मध्य प्रांतातील थम्बुटेगामा येथील रहिवासी असलेल्या अनुरा यांनी कोलंबो येथील केलानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली आहे. 1987 मध्ये भारतविरोधी बंडखोरी शिगेला असताना ते JVP मध्ये सामील झाले. पक्षाने दोन रक्तरंजित बंडखोरी केली होती. अनुरा 2014 मध्ये पक्षप्रमुख झाले. 2019 मध्ये, JVP चे नाव NPP झाले. अनुरा यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये भारताला भेट दिली, ज्यामुळे NPPचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.
विकरसिंघे आणि राजपक्षे यांच्या पक्षांचे नेते देश सोडून जात आहेत
श्रीलंकेतील निवडणूक निकाल जाहीर होताच राजपक्षे आणि विक्रमसिंघे यांच्या पक्षातील अनेक राजकारणी आणि बौद्ध भिक्षूंनी कोलंबो विमानतळावरून देश सोडला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, माजी मंत्री सुसंथा पंचनिलामे शनिवारी चेन्नईला रवाना झाले. दरम्यान, युनायटेड नॅशनल पार्टीचे सरचिटणीस पलिथा बंडारा शनिवारी रात्री थायलंडला रवाना झाले. इत्तेकंदे सदातिसा रविवारी हाँगकाँगला रवाना झाले. यापूर्वी महिदा राजपक्षे यांचे भाऊ आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे शुक्रवारीच निघून गेले होते.
अर्थव्यवस्था रुळावर आणावी लागणार
श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष अनुरा यांच्यासमोर दोन प्रकारची आव्हाने आहेत. प्रथम देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे आणि लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढणे समाविष्ट आहे. आर्थिक मंदीमुळे बंडखोरीला चालना मिळाली, ज्यामुळे 2022 मध्ये राजपक्षे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यावेळी श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपला होता, त्यामुळे देशाला इंधनासारख्या जीवनावश्यक वस्तूंची आयात करता आली नाही. अनुरा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर बड्या भ्रष्ट लोकांना तुरुंगात टाकण्यात अनुरा अपयशी ठरल्यास आगामी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या