एक्स्प्लोर

The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण

Nobel Peace Prize : हिबाकुशांच्या (Hibakusha) सन्मानाने एकप्रकारे अस्थितरेच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाला पुन्हा युद्ध नको, घातक शस्त्रांचा वापर मानवतेविरुद्ध नको, असाच संदेश देण्यात आला आहे.

The Nobel Prize Nihon Hidankyo : विनाशकारी दोन महायुद्धानंतर गेल्या सात दशकांपासून शीत युद्ध सुरुच असताना आता तिसऱ्या महायुद्धाचा सुद्धा भडका उडतो की काय? अशी स्थिती असतानाच दुसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांची धग सोसलेल्या जपानमधील निहोन हिदांक्यो (हिबाकुशा) संस्थेला (Nihon Hidankyo Japan Confederation of A- and H-Bomb Sufferers Organizations) नोबेल शांतता पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे. हिबाकुशांच्या (Hibakusha) सन्मानाने एकप्रकारे अस्थितरेच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाला पुन्हा युद्ध नको, घातक शस्त्रांचा वापर मानवतेविरुद्ध नको, असाच संदेश देण्यात आला आहे. जगाच्या पाठीवर आजघडीला रशिया आणि युक्रेन तसेच इस्त्रायल आणि पॅलेस्टीन-गाझा- लेबनाॅन-इराण असा टोकदार संघर्ष सुरु आहे. यामध्ये अनेकदा संहायक शस्त्रांचा वापर करण्यात आला असून नागरी वस्त्याही लक्ष्य केल्या जात आहेत. त्यामुळे जपानी हिबाकुशांची मानवतेसाठी चाललेली कृती उजवी ठरते. 

अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल

हिबाकुशा निहोन हिदांक्यो संस्थेच्या माध्यमातून जगभरात त्यांच्या दुःखाच्या आणि वेदनादायक आठवणी शेअर करतात. नोबेल समितीने म्हटले आहे की, एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल.

निहोन हिदांक्योची थोडक्यात ओळख 

निहोन हिंदांक्यो Nihon Hidankyoची स्थापना 1956 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीच्या (Hiroshima and Nagasaki) अणुबॉम्बस्फोटातून वाचलेल्यांनी केली होती. हिदांक्योने हिबाकुशाच्या साक्षींचे आयोजन केले आहे. ते त्यांच्या बॉम्बस्फोटांच्या वैयक्तिक कथा शेअर करतात. शांततेचा संदेश देण्यासाठी आणि अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी, अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठी आणि हिरोशिमा आणि नागासाकीच्या शोकांतिकेची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये संघटना एक शक्तिशाली आवाज आहे. उद्देश शांततेचा पुरस्कार करणे आणि बॉम्बस्फोटांमुळे प्रभावित झालेल्यांचे कल्याण सुनिश्चित करणे होते. अनेक दशकांपासून संस्थेने जपानी सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे उत्तम वैद्यकीय सेवा, आर्थिक सहाय्य आणि हिबाकुशाची आण्विक युद्धाचा बळी म्हणून मान्यता मिळावी यासाठी लॉबिंग केले आहे. हा गट अण्वस्त्रांच्या परिणामांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्याचे काम करतो आणि आण्विक नि:शस्त्रीकरणाच्या दिशेने हालचालींमध्ये सक्रियपणे सहभागी होतो.

कोण आहेत हिबाकुशा? 

निहोन हिडांक्यो (Nihon Hidankyo Japan Confederation of A- and H-Bomb Sufferers Organizations) या जपानी संस्थेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरात अण्वस्त्रांविरोधात प्रचार केल्याबद्दल सन्मान देण्यात आला आहे. या संघटनेमध्ये दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या विनाशकारी अण्वस्त्र हल्ल्यातून वाचलेल्यांचा समावेश आहे. त्यांना हिबाकुशा असे संबोधले जाते. 

निहोन हिदांक्यो संस्था कशी काम करते?

  • उद्देश : अणुबॉम्ब वाचलेल्यांचे प्रतिनिधित्व करणे आणि अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी प्रतिनिधीत्व करणे.
  • संस्थापक सदस्य: हिरोशिमा आणि नागासाकी (हिबाकुशा) चे वाचलेले.
  • मिशन :  जागतिक शांतता आणि आण्विक प्रसार रोखणे आणि  जगभरातील अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी मोहीम.
    अणुबॉम्ब पीडितांच्या वैद्यकीय, सामाजिक आणि आर्थिक मदत
  • संलग्नता :  संपूर्ण जपानमधील स्थानिक हिबाकुशा संघटनांशी युती.
  • उपक्रम : अणुबॉम्ब वाचलेल्यांच्या संरक्षणासाठी मजबूत कायद्यासाठी लॉबिंग. आण्विक युद्धाच्या धोक्यांबद्दल जनजागृती मोहीम. आण्विक नि:शस्त्रीकरणावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग. शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी हिबाकुशाच्या साक्ष.
  • वैद्यकीय आणि कल्याण सहाय्य :  वाचलेल्यांना वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत देऊन मदत.  किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे झालेल्या आरोग्य समस्यांची भरपाई आणि ओळखीसाठी लढा. 
  • प्रमुख उपलब्धी :  आण्विक शस्त्रास्त्र प्रतिबंध (2017) च्या कराराला जागतिक मान्यता मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. जपान आणि जगभरातील शांतता शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान

हिरोशिमा आणि नागासाकीवर 6-9 ऑगस्ट रोजी अण्वस्त्र हल्ले

6 ऑगस्ट 1945 रोजी रात्री 8:15 वाजता अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर अलोना गे विमानातून अणुबॉम्ब टाकला. 43 सेकंद हवेत राहिल्यानंतर त्याचा स्फोट झाला. यानंतर लगेचच आगीचा मोठा गोळा उठला आणि आजूबाजूचे तापमान 3000 ते 4000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. स्फोटामुळे इतका जोरदार वारा वाहू लागला की 10 सेकंदात स्फोट संपूर्ण हिरोशिमामध्ये पसरला. स्फोटानंतर काही मिनिटांतच 70 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.  या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी अमेरिकेने नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला. या बॉम्बला फॅट मॅन असे नाव देण्यात आले. हिरोशिमावर पडलेल्या बॉम्बचे नाव लिटल बॉय होते. 4500 किलो वजनाचा, फॅट मॅन 6.5 किलो प्लुटोनियमने भरलेला होता. नागासाकी येथे रात्री 11.02 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अण्वस्त्र हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपले.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget