कराड हादरलं.. 30 वर्षांच्या महिलेवर तरुणाकडून कोयत्यानं हल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात नेलं
Karad Crime News : कराड तालुक्यातील मलकापूर शहरात एका महिलेवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. महिलेला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. शिरवळमधील तरुणाच्या खुनाचं प्रकरण ताजं असतानाच कराड तालुक्यातील मलकापूर येथे एका महिलेवर कोयत्यानं हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी महिलेला प्रसंगावधान राखत रुग्णालयात दाखल केलं. तर, हल्लेखोर घटनेनंतर फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
युवकाकडून महिलेवर हल्ला
कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील दांगट वस्तीत कोयता हल्ल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. एका 30 वर्षीय महिलेवर युवकाकडून कोयता हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी प्रसंगावधान राखलं
या घटनेची माहिती मिळताच कराड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तात्काळ उपचारासाठी हलवले. पोलिसांनी जखमी महिलेला कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. हल्ला करणारा युवक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
कराड गुन्हे शाखेचे पोलीस अशोक बापकर आणि पोलीस उपनिरीक्षक भरते यांना घटनेची माहिती मिळताच ते दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या महिलेला चादरीमध्ये गुंडाळून ॲम्बुलन्स ची वाट न बघता रिक्षा मध्ये बसवून उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये मोठ्या धाडसाने नेलं आहे. जखमी महिलेवर सध्या उपचार सुरू आहे. फरार हल्लेखोर पोलिसांच्या हाती सापडल्यानंतर या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
युवकाच्या खून प्रकरणानं शिरवळमध्ये खळबळ
शिरवळ येथील एमआयडीसी परिसरात बुधवारी रात्री उशिरा जुन्या वादातून 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संशयित आरोपी पोलिसांसमोर हजर झाला होता. तलवारीनं वार करत आरोपीनं तेजस निगडेनं अमर कोंढाळकरची हत्या केली. या प्रकरणातील संशयित आरोपी तेजस निगडे या 19 वर्षीय युवकाने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली होती. रात्री उशिरा हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तात्काळ अमर कोंढाळकर यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचाराधीस्ताचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. या प्रकरणी शिरवळ पोलीस तपास करत आहेत.
इतर बातम्या :
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

