(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Florona: ओमायक्रॉननंतर जगासमोर आता प्लोरोनाचं संकट! इस्रायलमध्ये आढळला पहिला रुग्ण; कोरोना- इन्फ्लूएंझाचा डबल इन्फेशक्शन असल्याचा दावा
Florona Disease In Israel: इस्रायलमध्ये शुक्रवारी चौथ्या डोस म्हणजे बूस्टर डोससाठी परवानगी देण्यात आलीय.
Florona Disease In Israel: कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron) जगभरात थैमान घातलंय. जगभरातील विविध देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. यातच प्लोरोनाच्या रुपात जगसमोर नवं संकट उभ राहिलंय. इस्रायलमध्ये प्लोरोना संक्रमित पहिल्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. प्लोरोना हा कोविड-19 आणि एन्फ्लूएंझाचा (Influenza) डबल इन्फेक्शन असल्याचा दावा केला जातोय. अरब न्यूजनं याबाबत माहिती दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये शुक्रवारी चौथ्या डोस म्हणजे बूस्टर डोससाठी परवानगी देण्यात आलीय. इस्रायल मीडियाच्या वृत्तानुसार, या देशात चार महिन्यांपूर्वी कोरोनाची तिसरी लस देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागलीय.
इस्रायलचे आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक नचमन ऍश (Nachman Ash) यांनी आज प्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना चौथा बूस्टर डोस देण्याची परवानगी दिलीय. नचमन ऍश यांनी वृद्ध रूग्णांसाठीही लसीचा दुसरा डोस मंजूर केलाय. यामुळं रुग्णसंख्येत घट होण्याची शक्यता आहे. तसेच मृत्युचा धोकाही कमी होईल, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय.
कोरोना अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत जगात 33 व्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू हे भारतात झाले आहेत. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या मुद्यावर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला पत्र लिहलंय. यामध्ये केंद्रने प्रत्येक राज्यांनी कोरोनाचे टेस्टींग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आरटीपीसीआरच्या ऐवजी रॅपीड आणि एंटीजन टेस्ट करण्याच्या सूचना देखील केंद्र सरकारनं राज्यांना केल्या आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha