गेल्या 24 तासात देशभरात 22 हजार 775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 406 जणांचा मृत्यू
देशात गेल्या 24 तासामध्ये 22 हजार 775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 949 कोरोनातून बरे झाले आहे.
corona Cases In india : देशात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाबरोबर ओमायक्रॉनच्या रुगणसंख्येत देखील वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासामध्ये 22 हजार 775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 949 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर गेल्या 24 तासामध्ये देशात कोरोनामुळे 406 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या भारतातील सक्रिय रुग्णांचा आकडा हा 1 लाख 4 हजार 781 आहे. तर रिकव्हरी रेट 98.32 टक्के आहे.
याचबरोबर देशात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढ असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही 1 हजार 431 झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये ओमायक्रॉन रुग्ण सर्वात जास्त आहेत. सध्या महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही 454 आहे, तर दिल्लीत 351 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.
देशभरात कोरोनाची स्थिती
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 3 कोटी 48 लाख 61 हजार 579 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 81 हजार 486 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 75 हजार 312 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 1 लाख 4 हजार 781 आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोरोना लसीचे 145 कोटी 16 लाख 24 हजार डोस देण्यात आले आहेत. दिवसेंदिवस देशात लसीकरणाचा वेग देखील वाढवण्याच्या सुचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या आहेत.
कोरोना अॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत जगात 33 व्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू हे भारतात झाले आहेत. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या मुद्यावर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला पत्र लिहले आहे. यामध्ये केंद्रने प्रत्येक राज्यांनी कोरोनाचे टेस्टींग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आरटीपीसीआर च्या ऐवजी रॅपीड आणि एंटीजन टेस्य करण्याच्या सूचना देखील केंद्र सरकारने राज्यांना केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: